First Female Umpire : न्यूझीलंडची (New Zealand) महिला पंच किम कॉटनने (Kim Cotton) बुधवारी (5 एप्रिल) इतिहास रचला. न्यूझीलंड आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन टी-20 मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात अंपायरिंग करताना त्यांनी आपल्या नावाची इतिहासाच्या पानात नोंद केली. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच (Umpire) म्हणून काम करणाऱ्या किम कॉटन या ऑन फिल्ड पहिल्या महिला पंच बनल्या. त्या न्यूझीलंडच्या पंच आहेत आणि त्यांनी आतापर्यंत शेकडो सामन्यांमध्ये पंच म्हणून जबाबदारी पार पडली आहे.


किम कॉटन यांची कारकीर्द


48 वर्षीय किम कॉटन यांनी आतापर्यंत दोन T20 आंतरराष्ट्रीय आणि 54 महिला T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केलं आहे. 2018 पासून किम कॉटन यांनी 24 महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये अंपायरिंगची भूमिका बजावली होती. यादरम्यान टीव्ही अंपायर म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. याशिवाय त्यांनी सहा फर्स्ट क्लास, चार लिस्ट-ए आणि 25 टी-20 सामन्यामध्ये अंपायरिंग केलं आहे. 2020 मध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात हॅमिल्टनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथमच किम कॉटनने पुरुषांच्या सामन्यात त्यांची उपस्थिती होती बाजी मारली होती. तेव्हा त्यांनी टीव्ही अंपायर म्हणून जबाबदारी पार पाडली होती.






न्यूझीलंडकडून श्रीलंकेचा पराभव, टी-20 मालिकेत बरोबरी


न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने श्रीलंकेचा 32 चेंडू आणि 9 विकेट्स राखून पराभव केला आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. अॅडम मिल्ने (5 विकेट्स) आणि टिम सेफर्ट (नाबाद 79 धावा) यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे न्यूझीलंडचा दमदार विजय झाला. ड्युनेडिनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करत  19 षटकात 141 धावांवर केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडने हे लक्ष्य 14.4 षटकांत एक विकेट गमावून पूर्ण केलं. अॅडम मिल्नने याने 4 षटकात 26 धावा देत 5 विकेट घेतल्या. त्याच्या चमकदार कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं. या विजयासह किवी संघाने तीन T-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. दोन्ही देशांमधला तिसरा आणि शेवटचा T20 आंतरराष्ट्रीय सामना शनिवारी (8 एप्रिल) क्वीन्सटाउन इथे खेळवला जाणार आहे.