New Zeland vs Sri Lanka : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील (SL vs NZ) कसोटी सामन्यात केन विल्यमसनने आपल्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडला श्रीलंकेविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर धाव घेत केननं किवी संघाला विजय मिळवून दिला. या विजयाचा सर्वात मोठा फायदा टीम इंडियाला झाला. या सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाल्याने भारतीय संघ WTC फायनलमध्ये पोहोचला आहे. अशा स्थितीत भारतीय चाहते आता केन विल्यमसनचे आभार मानत सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पाडत आहेत.


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये खेळला जाणारा सामना अनिर्णित झाला आहे. अशा परिस्थितीत जर श्रीलंकेच्या संघाने क्राइस्टचर्च कसोटी जिंकली असती आणि त्यानंतर वेलिंग्टन कसोटी जिंकली असती, तर श्रीलंकेचा संघ भारताऐवजी डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचला असता. पण विल्यमसनच्या शतकाने श्रीलंकेकडून विजय हिसकावून घेतला. त्याने 121 धावांची नाबाद इनिंग खेळून आपल्या संघाला दोन विकेट्सने रोमांचक विजय मिळवून दिला. ज्यामुळे भारत WTC Final मध्ये पोहोचल्याने भारतीय चाहते न्यूझीलंडचे आभार मानत आहेत.






























अतिशय रोमांचक झाला सामना


या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने पहिले दोन दिवस वर्चस्व गाजवले. यानंतर तिसऱ्या दिवशी किवी संघाचा वरचष्मा होता. त्यानंतर चौथ्या आणि पाचव्या दिवशी दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत झाली. श्रीलंकेने न्यूझीलंडला विजयासाठी 285 धावांचे लक्ष्य दिले होते, जे न्यूझीलंडने शेवटच्या चेंडूवर 8 विकेट्स गमावून पूर्ण केले.


हे देखील वाचा-