Jos Buttler questions Harshit Rana as Shivam Dube concussion sub : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या टी-20 मालिकेचा निकाल शेवटच्या सामन्यापूर्वीच लागला आहे. टीम इंडियाने चौथ्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा 15 धावांनी पराभव करत पाच सामन्यांची मालिका जिंकली. पण आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. ज्यामध्ये आता भारतीय संघावर बेईमानी केल्याचा आरोप होत आहे. याचे कारण म्हणजे कन्कशन सबस्टिट्यूट नियम.
ज्यामुळे शिवम दुबे जखमी झाल्यावर हर्षित राणाला मैदानावर आला होता, आणि टर्निंग पॉइंट ठरला. ज्यामुळे इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर खूप निराश दिसत होता.
खरंतर, या सामन्यादरम्यान टीम इंडियाने असा निर्णय घेतला, ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले. टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू शिवम दुबे या सामन्यादरम्यान जखमी झाला. जेव्हा तो डावाच्या 20 व्या षटकात फलंदाजी करत होता. चेंडू थेट त्याच्या हेल्मेटला लागला. त्यानंतर, सामन्याच्या दुसऱ्या डावात हर्षित राणाला शिवम दुबेच्या जागी कंकशन पर्याय म्हणून प्लेइंग -11 मध्ये समाविष्ट करण्यात आले.
भारतीय संघाच्या या कृतीवर बरीच टीकाही झाली. खरंतर, लाईक टू लाईक कन्कशन म्हणजे जर एखादा खेळाडू जखमी झाला असेल आणि त्याच्या कन्कशनचा समावेश प्लेइंग-11 मध्ये होत असेल, तर त्याच शैलीतील खेळाडूलाच संधी मिळेल. संघ प्लेइंग-11 मध्ये फलंदाजाऐवजी गोलंदाज किंवा गोलंदाजाऐवजी फलंदाजाचा समावेश करू शकत नाही. या सामन्यात, एका ऑलराउंडरऐवजी एका गोलंदाजाचा प्लेइंग-11 मध्ये समावेश करण्यात आला.
भारताविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यानंतर कन्कशन सबस्टिट्यूटच्या मुद्यावर बोलताना बटलर म्हणाला की, "शिवम दुबे हा बॅटिंग ऑलराउंडर आहे, त्याच्या जागी समतुल्य बदली खेळाडू मैदानात उतरला नव्हता." गोलंदाजी वेळी त्याचं स्पीड किती असते हे सांगत बटलरनं हर्षित राणा त्याची लाइफ फॉर लाइफ रिप्लेसमेंट होऊ शकत नाही. पण आम्ही या निर्णयाशी सहमत नाही, असे तो म्हणाला.
आकाश चोप्रानेही उपस्थितीत केला प्रश्न
जोस बटलरच नाही तर भारताचा माजी क्रिकेटर आकाश चोप्रानेही मॅच दरम्यान हर्षित राणा हा शिवम दुबेची रिप्लेसमेंट कसा होऊ शकतो? असा प्रश्न उपस्थित केला. चोप्रा याने ट्विट केले आणि म्हणाला की, “जर हर्षित गोलंदाजी करत असेल तर ही बदली लाइक फॉर लाइक नाही. कन्कशन सबस्टिट्यूट रुपात शिवम दुबेच्या जागी रमणदीप सिंग हा टीम इंडियाकडे परेफेक्ट रिप्लेसमेंट होता.”
हे ही वाचा -