न्यूयॉर्क : इंग्लंड क्रिकेट टीमचा कॅप्टन जोस बटलरच्या (Jos Buttler) घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे.  बटलरची पत्नी लूसी वेबरनं  गोंडस बाळाला जन्म दिला आहे. जोस बटलरनं लेकाचा फोटो शेअर केला आहे. बटलरनं बातमी देताच क्रिकेटमधील दिग्गजांकडून त्याला शुभेच्छा देण्यात येत आहेत. जोस बटलर आणि लूसी वेबरचं हे तिसरं अपत्य आहे. या दोघांना अगोदर दोन मुली आहेत. जोस बटलर आणि त्याच्या पत्नीनं लेकाचं नाव चार्ली ठेवलं आहे. चार्लीचा जन्म 28 मे 2024  ला झाला आहे. जोस बटलर सध्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2024) व्यस्त आहे.   


जोस बटलर अगोदरपासून दोन लेकींचा पिता


जोस बटलर याने ऑक्टोबर 2017 मध्ये लूसी वेबर हिच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर दीड वर्षात बटलर आणि लूसी वेबर यांना पहिली मुलगी झाली. तिचा जन्म एप्रिल 2019 मध्ये झाला होता. बटलरच्या पहिल्या लेकीचं नाव जॉर्जिया रोज असं आहे. यानंतर दोन वर्षांनी बटलरला दुसरी मुलगी झाली. तिचा जन्म सप्टेंबर 2021 मध्ये झाला. बटलरनं तिचं नाव मॅरगॉट ठेवलं आहे. आता जोस बटलर आणि लूसी वेबर हिला मुलगा झाला आहे. या दोघांनी त्याचं नाव चार्ली असं ठेवलंय.




जोस बटलर सध्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये व्यस्त


इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर सध्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये व्यस्त आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत सुरु असलेल्या वर्ल्ड कपमध्ये तो इंग्लंडचं नेतृत्त्व करतोय. इंग्लंडनं आज ओमानला पराभूत केलं असून त्यांचा सुपर 8 चा प्रवास खडतर आहे. इंग्लंडचा संघ ब गटात तिसऱ्या स्थानावर आहे. या गटात ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. तर, स्कॉटलँड दुसऱ्या स्थानावर असून इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडकडे सध्या तीन गुण आहेत. ओमानला पराभूत केल्यानंतर इंग्लंडचं नेट रनरेट +3.081 इतकं बनलं आहे. इंग्लंडला सुपर 8 मध्ये जायचं असल्यास नामिबियाला पराभूत करावं लागेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियानं स्कॉटलँडला पराभूत करणं आवश्यक आहे.  जोस बटलरनं टी -20 वर्ल्ड कपमध्ये दोन डावात 66 धावा केल्या आहेत.


संबंधित बातम्या : 


T 20 World Cup 2024 :सुपर 8 मध्ये भारताविरुद्ध कोण भिडणार? दोन संघ ठरले, तिसऱ्याबाबत सस्पेन्स कायम


T20 World Cup 2024 : अफगाणिस्तान ते भारत आतापर्यंत सुपर 8 मध्ये कुणी एंट्री केली? पाकिस्तानची धाकधुक कायम