न्यूयॉर्क : टी 20 वर्ल्ड कपचं (T 20 World Cup 2024) आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिकेनं केलं आहे. अमेरिकेच्या संघानं दमदार कामगिरीच्या जोरावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अमेरिकेनं कॅनडा आणि पाकिस्तानला पराभूत करत अ गटात दुसरं स्थान पटकावलं आहे. अमेरिकेनं (USA) पाकिस्तान विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये विजय खेचून आणला. अमेरिकेच्या विजयाचा हिरो सौरभ नेत्रावळकर ठरला होता. सौरभ नेत्रावळकरनं (Saurabh Netravalkar)भारताविरुद्ध देखील दमदार कामगिरी केली होती. सौरभ नेत्रावळकरनं विराट कोहली आणि रोहित शर्माची विकेट घेतली होती. सौरभ नेत्रावळकरच्या बहिणीचं एक वक्तव्य चर्चेत आहे. अमेरिकेसाठी क्रिकेट खेळल्यानंतर ज्यावेळी सौरभ नेत्रावळकर हॉटेलमध्ये असतो त्यावेळी तो त्याच्या कंपनीसाठी वर्क फ्रॉम हॉटेल काम करतो, असं निधी नेत्रावळकरनं म्हटलं आहे. 


सौरभ नेत्रावळकर मैदानावर त्याच्या गोलंदाजीनं फलंदाजांना सळो की पळो करुन सोडत आहे. मात्र, मॅच संपल्यानंतर हॉटेलमध्ये तो त्याच्या ऑफिसचं काम करतो. सौरभ नेत्रावळक क्रिकेटर असून ओरॅकल कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर देखील आहे. क्रिकेट खेळल्यानंतर सौरभ हॉटेलमध्ये असताना त्याच्या कंपनीच्या कामात व्यस्त असतो, असं त्याची बहीण निधी नेत्रावळकर म्हटलं. 


सौरभसोबत लॅपटॉप कायम असतो...


सौरभ नेत्रावळकरला त्याच्या करिअरमध्ये पाठिंबा देणारे लोक अधिक भेटले, असं त्याच्या बहिणीनं म्हटलं आहे. जेव्हा आपण क्रिकेट खेळत नाही तेव्हा संपूर्ण लक्ष नोकरीवर द्यावं लागेल, हे त्याला माहिती आहे. तो जिकडे जाईल तिकडे लॅपटॉप घेऊन जातो. कंपनीनं त्याला सूट दिली आहे, तो जेव्हा शक्य असेल तेव्हा काम करु शकतो, असं निधी नेत्रावळकर हिनं म्हटलं. 


सौरभ त्याच्या व्यावसायिक आणि स्पोर्टससंदर्भातील जबाबदारी योग्यपणे पार पाडतो. जेव्हा भारतात यायचं असेल तेव्हा तो लॅपटॉप घेऊन येतो. तो समर्पण भावनेनं काम करतो, असं निधी नेत्रावळकर म्हणाली. 


सौरभ नेत्रावळकर ओरॅकल कंपनीत कमा करतो. भारताकडून त्यानं अंडर 19 टीमकडून वर्ल्ड कप स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्कॉलरशिप मिळाल्यानंतर त्यानं कॉर्नेल विद्यापीठात शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेत आल्यानंतर सौरभच्या क्रिकेटला ब्रेक लागला होता. मात्र, त्यानं पुन्हा क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि तो अमेरिकेच्या टीमचा प्रमुख खेळाडू बनला आहे. 


दरम्यान, आज अमेरिका आणि आयरलँड यांच्यातील निर्णायक मॅच आहे. या मॅचमध्ये विजय मिळवल्यास किंवा पावसामुळं मॅच रद्द झाल्यास अमेरिका सुपर 8 मध्ये प्रवेश करणार आहे. 


संबंधित बातम्या : 



मोठी बातमी : न्यूझीलंडचं विश्वचषकातील आव्हान संपलं, अफगाणिस्तानचा सुपर 8 मध्ये दणक्यात प्रवेश!