ICC World Test Championship Final Venue Change : भारतीय क्रिकेट परिषद बोर्डाचे (BCCI) सचिव जय शाह यांची काल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) नवे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. जय शाह आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत. जय शाह चेअरमन बनल्यानंतर आता पुढील वर्षी होणा-या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या ठिकाणाबाबत चर्चेला उधाण आले आहे, जे इंग्लंडमधील लॉर्ड्सवर खेळवण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, आता यात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे, कारण खुद्द जय शाह यांनी काही काळापूर्वीच स्थळ बदलण्याचे बोलले होते.


काय म्हणाले जय शहा?


आतापर्यंत प्रत्येक वेळी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल इंग्लंडमध्येच झाली आहे. त्याचवेळी जय शाह यांनी मे महिन्यात स्थळ बदलण्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर ते म्हणाले होते की, डब्ल्यूटीसी फायनलचे ठिकाण बदलण्याबाबत बीसीसीआयने आयसीसीशी चर्चा केली आहे. आयसीसी बदल करण्याचा विचार करू शकते. मात्र, त्यावेळी आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले होते, पण आता जय शाह स्वतः हे पद सांभाळतील. या कारणास्तव, ते या कसोटी फॉरमॅट स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेणार की नाही याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.






भारतीय संघ आतापर्यंत दोनदा हरला 


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची पहिली सायकल 2019 आणि 2021 दरम्यान खेळली गेली, ज्यामध्ये भारत आणि न्यूझीलंडने चांगली कामगिरी केली आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र, साउथॅम्प्टनमध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाची कामगिरी खराब राहिली आणि न्यूझीलंडने 8 विकेट्सने विजय मिळवला. 


यानंतर 2021 ते 2023 दरम्यान दुसरी सायकल खेळली गेली, ज्यामध्ये भारताची कामगिरी पुन्हा उत्कृष्ट होती, परंतु ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 209 धावांनी पराभव केला.


सध्याच्या WTC सायकलमध्येही टीम इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे आणि पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. भारताने 9 पैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 2 हार आणि 1 सामना अनिर्णित राहिला आहे. त्याच्या गुणांची टक्केवारी 68.52 आहे. फायनलमध्ये पोहोचण्याचा टीम इंडियाचा दावा खूप मजबूत दिसत आहे आणि चाहत्यांना यावेळी जिंकण्याची इच्छा आहे.


हे ही वाचा -


ICC Test Rankings 2024 : बाबर आझम पडला तोंडघशी.... विराट-जैस्वाल यांनी न खेळता घेतली मोठी झेप