India vs Pakistan, Asia Cup 2023 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात उद्या हायहोल्टेज सामना होणार आहे. चार वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एकदिवसीय सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन म्हटले की मैदानाबाहेरही वातावरण तितकेच गरम असते. शाब्दिक चकमकी होतातच.. असाच एक प्रसंग 2004 मध्ये घडला होता. पाकिस्तानच्या मियांदादचे विधान ऐकून इरफान पठाणच्या वडिलांनी थेट पाकिस्तान संघाची ड्रेसिंग रुम गाठली होती. त्यावेळी नेमकं काय झाले होते, पाहूयात...
माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण 2004 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता, तेव्हा दिग्गज पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियांदादने त्याच्याबद्दल एख विधान केले होते. ज्यामुळे इरफान पठाणचे वडील चांगलेच संतापले. इरफान पठाणने एका शोदरम्यान या घटनेचा खुलासा केला होता.
2004 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 15 वर्षांनंतर कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानला गेला होता. या दौऱ्यात इरफान पठाण या युवा खेळाडूला संधी देण्यात आली होती. इंझमाम उल हक याच्याकडे पाकिस्तान संघाचे कर्णधारपद होते तर जावेद मियांदाद प्रशिक्षक होते. जावेद मियांदाद क्रिकेट कारकिर्दीत आणि त्यानंतरही वादांसाठी ओळखला जातो. आपल्या कोचिंग कारकिर्दीत त्यांनी अनेक असभ्य टिप्पण्याही केल्या आहेत. त्याने इरफान पठाणबद्दलही वक्तव्य करत वाद ओढावून घेतला होता.
2004 मध्ये इरफान पठाणच्या गोलंदाजीची जोरदार चर्चा होती. इरफान पठाण याच्या स्विंगपुढे दिग्गजही फेल जात होते. अशातच मियांदाद याने इरफान पाठाणसारखे गोलंदाज पाकिस्तानच्या प्रत्येक गल्लीमध्ये मिळतील, असे वक्तव्य केले होते. इरफान पठाण याने मियांदादच्या वक्तव्याकडे लक्ष्य न देता आपला स्वभाविक खेळ केला. भारताच्या विजयात इरफान पठाण याने मोलाची भूमिका बजावली होती.
2004 मधील मियांदादच्या वक्तव्याबद्दल स्टार स्पोर्ट्सच्या एका शो दरम्यान इरफान पठाण याने किस्सा सांगितला. इरफान पठाणसारखे गोलंदाज आमच्याकडे प्रत्येक गल्लीमध्ये मिळतील, या मियांदादच्या वक्तव्यामुळे इरफानचे वडील संतापले होते. इरफानने सांगितले होते की, त्याच्या वडिलांना जावेद मियांदादला भेटायचे होते. कारण, मियांदादचे वक्तव्य त्यांना पटले नव्हते.. इरफान पठाणच्या वडिलांनी पाकिस्तानची ड्रेसिंग रुम गाठली... इरफानच्या वडिलांना ड्रेसिंग रुममध्ये आल्याचे पाहून मियांदाद याच्या तोंडातून शब्दही निघाला नाही..
आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्ण.
राखीव खेळाडू : संजू सॅमसन
आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ
फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम जुनिअर, अब्दुल्ला शफीक, उसामा मीर, सऊद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, नसीम शाह, हारिस रऊफ.