Team India Playing 11 Against Pakistan : आशिया चषकाची दिमाखात सुरुवात झाली आहे. पाकिस्तानने नेपाळचा पराभव केला तर श्रीलंकेने बांगलादेशवर विजय मिळवला. भारताचा पहिला सामना दोन सप्टेंबर रोजी होणार आहे. शनिवारी होणाऱ्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. चार वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय सामना होत आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्व क्रीडा जगताचे लक्ष आहे. पण या सामन्यात भारताची प्लेईंग 11 कशी असेल, याबाबत संभ्रम कायम आहे. केएल राहुल उपलब्ध नसल्यामुळे टीम इंडियाची अडचण वाढली आहे. 


दोन सामन्यासाठी राहुल उपलब्ध नाही - 


आयपीएल 2023 दरम्यान केएल राहुल याला दुखापत झाली होती, ती अद्याप बरी झाली नसल्याचे दिसतेय. आशिया चषकाच्या पहिल्या दोन सामन्यासाठी राहुल उपलब्ध नाही. त्यामुळे ईशान किशन पाकिस्तानविरोधात विकेटकिपिंग करणार, हे जवळपास निश्चित मानले जातेय. पण तो कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार.. हे क्रीडा चाहत्यांना कोडे पडलेय. 


भारताचा मध्यक्रम कसा ?


ईशान किशन याने वेस्ट इंडिजविरोधात वनडेमध्ये लागोपाठ तीन अर्धशतके ठोकली होती. त्या मालिकेत ईशान किशन याने सलामीला फलंदाजी केली होती. आता आशिया चषकात ईशान किशन याला संधी मिळाल्यास कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार ? तिसऱ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार? विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणार का ? यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. श्रेयस अय्यर कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार... याबाबतही सस्पेन्स कायम आहे. 


गोलंदाजीत कोण कोण असेल - 


पाकिस्तानविरोधात भारतीय संघ दोन फिरकी गोलंदाजांना खेळवण्याची शक्यता आहे. कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा यांची निवड निश्चित मानली जात आहे. वेगवान गोलंदाजीत भारत तिन्ही प्रमुख गोलंदाजांना स्थान मिळू शकते. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी आणि मोहम्मद सिराज यांना प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. या पाच गोलंदाजांच्या जोडीला हार्दिक पांड्या असेल. हार्दिक पांड्या आणि रविंद्र जाडेजा अष्टपैलूची भूमिका बजावू शकतात. 


पाकिस्तानविरोधात भारताची संभाव्य प्लेईंग 11 


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.


आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ


रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्ण.


राखीव खेळाडू : संजू सॅमसन


आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ 


फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम जुनिअर, अब्दुल्ला शफीक, उसामा मीर, सऊद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, नसीम शाह, हारिस रऊफ.