Australia vs India 3rd Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा तिसरा सामना गाबा मैदानावर खेळवला जात आहे. ज्यामध्ये पहिल्या दिवशी पावसामुळे वाया गेला. त्यामुळे पहिल्या दिवशी केवळ 13.2 षटकेच खेळता आली. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकही विकेट न गमावता 28 धावा केल्या आहेत.






सामन्यादरम्यान बुमराह पाचव्या षटकात चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न करत होता, पण खेळपट्टीकडून फारशी मदत मिळत नव्हती. त्यावेळी बुमराह स्टंप माईक मध्ये म्हणाला की, स्विंग होत नाही. ढगाळ वातावरणात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही चाहते रोहितच्या निर्णयावर नाराज होते, त्यामुळे त्यांनी कर्णधाराला ट्रोल केले.






पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ खंडित 


सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाज लय शोधण्यासाठी धडपडताना दिसले आणि त्यांना विकेट घेता आली नाही. मात्र, भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्विनी यांना फारशी संधी दिली नाही.


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा खेळ सततच्या पावसामुळे रद्द करण्यात आला. सामन्याच्या पहिल्या दिवशी केवळ 13.2 षटकेच खेळता आली. यष्टीपर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात बिनबाद 28 धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजा नाबाद 19 धावा आणि नॅथन मॅकस्विनी चार धावांवर नाबाद आहेत. 


पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे आता दुसऱ्या दिवशी 98 षटके टाकली जातील आणि सामना नियोजित वेळेच्या अर्धा तास आधी सुरू होईल. म्हणजेच दुसऱ्या दिवसाचा सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 5:20 वाजता सुरू होईल.






हे ही वाचा -


Ind vs Aus 3rd Test : BCCIने केली मोठी घोषणा! गाबा कसोटी सामन्याची वेळ अचानक बदली, 4 दिवसांसाठी काय आहे टायमिंग? जाणून घ्या सर्वकाही


Mohammad Amir : पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, 24 तासांत 2 खेळाडूंनी घेतली तडकाफडकी निवृत्ती, एकाने भोगला तुरुंगवास!