टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आज गोव्यात टीव्ही अँकर संजना गणेशनबरोबर विवाहबंधनात अडकला. बुमराह आणि संजनाने त्यांचे नातेवाईक आणि जवळचे मित्र यांच्यासह खासगी कार्यक्रमात लग्न केले.


कोरोनाचे सर्व नियम पाळून हा विवाहसोहळा पार पाडला. यामुळे लग्नाच्या कार्यक्रमात अगदी जवळचे लोकच सामील झाले होते. बुमराह आणि संजना गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत.


भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणार्‍या चार कसोटी सामन्यांच्या चौथ्या कसोटी सामन्यात बुमराहने आपले नाव मागे घेतले होते. जसप्रीत बुमराह याने वैयक्तिक कारणास्तव बीसीसीआयकडे रजा मागितली होती, ती मान्य करण्यात आली. पण काही दिवसांनंतर कळले की जसप्रीत बुमराह लग्न करणार आहे.


 






यानंतर जेव्हा भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली गेली तेव्हा जसप्रीत बुमराहच्या नावाचाही त्यात समावेश नसल्याचे दिसून आले.


संजना गणेशन कोण आहे?
28 वर्षीय संजना गणेशन ही क्रिकेट अँकर आहे. ती बर्‍याच क्रिडा स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे. आयपीएलमध्ये सक्रिय राहण्याव्यतिरिक्त ती स्टार स्पोर्ट्ससोबत काम करत होती. 2019 आयसीसी विश्वचषक ते इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला संजनाने होस्ट केले आहे, त्याशिवाय संजना कोलकाता नाईट रायडर्सची अँकर म्हणून काम करत आहे. संजनाने 2013 मध्ये फेमिना गॉर्जियसचे विजेतेपद जिंकले होते.