बारबाडोस : भारतानं (Team India) आयसीसी टी 20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2024)अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला (South Africa) पराभूत करत विजेतेपद मिळवलं. भारतानं या विजेतेपदासह आयसीसी ट्रॉफी विजयाचा गेल्या 11 वर्षांचा दुष्काळ संपवला. रोमांचक लढतीत भारतानं हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगनं दमदार गोलंदाजी करुन मॅच खेचून आणली. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या 5 ओव्हरमध्ये 30  धावा करायच्या होत्या. पण, भारताच्या आक्रमक गोलंदाजीमुळं आफ्रिकेचे प्रयत्न अपुरे पडले. जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) प्लेअर ऑफ द टूर्नामेट ठरला. भारतानं आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत करताच सर्व खेळाडूंनी जल्लोष केला. जसप्रीत बुमराहनं संघातील खेळाडूंची भेट घेतल्यानंतर पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) हिला कडकडून मिठी मारली. 


जसप्रीत बुमराहची संजनाला कडकडून मिठी 


जसप्रीत बुमराहनं टी 20 वर्ल्ड कपच्या 8 मॅचेसध्ये  15 विकेट घेतल्या. यामुळं त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट पुरस्कार देऊन बुमराहचा गौरव करण्यात आला. त्यापू्र्वी भारतानं दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी पराभूत केल्यानंतर सर्व खेळाडूंनी जल्लोष केला. जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन देखील टीम इंडियाच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाली होती. जसप्रीत बुमराहनं संजना गणेशनला मिठी मारुन विजयाचा आनंद साजरा केला. जसप्रीत बुमराहनं मॅच संपल्यानंतर संजनाला मुलाखत दिली.  



पाहा व्हिडीओ : 







जसप्रीत बुमराहनं पत्नीला मुलाखत देताना अंगद इथं आहे त्यानं वडिलांना वर्ल्ड कप जिंकताना पाहणं आनंद देणार आहे, असं म्हटलं. आम्ही पॅनिक झालो नाही, विजयाचं वर्णन करायला शब्द कमी पडतात, असं बुमराहनं म्हटलं.  


 
जसप्रीत बुमराहनं पोस्ट मॅच प्रेझेंटशनमध्ये बोलताना म्हटलं की शांत होत खेळण्याचा प्रयत्न केला. आम्ही यासाठी खेळतो मी सातव्या आसमंताच्या वर आहे. माझा मुलगा इथं आहे, कुटुंब इथं आहे. आम्ही विजयासाठी खूप मेहनतं केली आहे. यापेक्षा मोठं काही असू शकत नाही. मोठ्या मॅचेस तुम्हाला सर्वोत्तम बनवतात. पूर्ण स्पर्धेत शांत राहिलो होतो. आता विजयानंतर भावना समोर आल्या आहेत. अनेकदा मी भावना जाहीर करत नाही. मात्र, आता काम पूर्ण झालंय. आज माझ्याकडे शब्द नाहीत. मॅचनंतर रडत नाही पण आज भावना अनावर झाल्या, असं बुमराहनं म्हटलं.    


संबंधित बातम्या : 


विश्वषचक हातात धरताच जंटलमन राहुल द्रविडचा शांत आवेश झटक्यात बदलला; सेलिब्रेशन पाहून सगळेचं पाहत राहिले


T20 World Cup 2024 Final: बुमराहचं षटक अन् सूर्यकुमारचा अफलातून झेल; विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील टर्निंग पॉईंट, Video