India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा दुसरा डाव आटोपला आहे. भारत 266 धावांवर सर्वबाद झाला असून त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांची गरज आहे. भारताच्या दुसऱ्या डावात अनुभवी रहाणे आणि पुजारा यांनी अर्धशतकं झळकावली असून विहारीने नाबाद 40 धावा केल्यामुळे भारताने ही धावसंख्या उभारली आहे.

  



आतापर्यंत सामन्यात प्रथम फलंदाजी घेतल्यानंतर भारताने पहिल्या डावात 202 धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने फलंदाजी करत पहिल्या दिवसाअखेर 1 विकेट गमावत 35 धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा खेळ सुरु झाल्यावर शार्दूलने आफ्रिकेचे तीन गडी पटापट बाद केले. पण त्यानंतर बावुमा आणि काईल या जोडीने डाव सावरला आणि धावसंख्या 160 च्या पुढे पोहोचवली. पण 162 धावांवर काईल बाद होताच 177 धावांवर बावुमाही बाद झाला. नंतर लगेचच शमीने रबाडालाही तंबूत धाडलं. ज्यानंतर मार्को आणि महाराज यांनी आठव्या गड्यासाठी काही धावा केल्या पण महाराजला बुमराहने (Jasprit Bumrah) बाद करताच शार्दूलने अखेरचे दोन गडी बाद करत आफ्रिकेला 229 धावांत सर्वबाद केलं.


त्यानंतर भारताने दुसरा डाव खेळण्यास सुरुवात केली. भारताचे बहुतांश फलंदाज फेल झाले. मात्र अनुभवी अजिंक्य रहाणेने 58 आणि चेतेश्वर पुजाराने 53 धावा केल्या. तसंच अखेरपर्यंत क्रिजवर राहून हनुमा विहारीने महत्त्वपूर्ण अशा नाबाजद 40 धावा केल्यामुळे भारताचा डाव 200 पार गेला. ज्यामुळे विजय मिळवण्यासाठी आफ्रिकेला 240 धावांची गरज आहे. 


हे ही वाचा -



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live