Jammu and Kashmir shock defending champions Mumbai : मुंबई संघात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, कसोटी सलामीवीर यशस्वी जैस्वाल, मधल्या फळीत माजी कर्णधार अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर आणि शिवम दुबेसारखे खेळाडू असतानाही काश्मीर विरुद्ध त्यांच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पारस डोग्राच्या नेतृत्वाखाली जम्मू आणि काश्मीरने मुंबईचा 5 गडी राखून पराभव केला. या सामन्यात मुंबईसाठी शार्दुल ठाकूरने पहिल्या डावात अर्धशतक तर दुसऱ्या डावात शतक झळकावले, परंतु तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
मुंबईचा 5 विकेट्सनी पराभव
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकली आणि त्यानंतर पहिल्या डावात शार्दुल ठाकूरच्या 51 धावांच्या खेळीच्या जोरावर संघाने 120 धावा केल्या. प्रत्युत्तरात, शुभम खजुरियाच्या 53 धावांच्या खेळीच्या जोरावर जम्मू आणि काश्मीरने पहिल्या डावात 206 धावा केल्या. पहिल्या डावात जम्मू आणि काश्मीरने मुंबईवर 86 धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात जम्मू आणि काश्मीरकडून उमर नझीर आणि युद्धवीर सिंग यांनी प्रत्येकी 4 विकेट घेतल्या.
यानंतर, दुसऱ्या डावात मुंबई संघाची हालत खराब होती, पण शार्दुल ठाकूरने 119 धावांची शानदार खेळी केली आणि तनुष कोटियनने संघासाठी 62 धावांची महत्वाची इनिंग खेळली. या दोन डावांच्या आधारे मुंबईने दुसऱ्या डावात 290 धावा केल्या. मुंबईला 204 धावांची आघाडी मिळाली आणि या संघाने जम्मू-काश्मीरला विजयासाठी 205 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरादाखल, जम्मू आणि काश्मीरने दुसऱ्या डावात 5 गडी बाद 207 धावा केल्या आणि सामना 5 गडी राखून जिंकला.
दुसऱ्या डावात जम्मू आणि काश्मीरकडून मुंबईविरुद्ध युधवीर सिंगने 3 तर आकिब नबीने 4 विकेट घेतल्या. या सामन्याच्या दोन्ही डावात 7 विकेट घेणाऱ्या युद्धवीर सिंगला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. दुसऱ्या डावात मुंबईकडून शम्स मुलानीने 4 तर मोहित अवस्थीने 1 विकेट घेतली.
हे ही वाचा -