MUM vs JAM Why Ajinkya Rahane Recall after Out : रणजी ट्रॉफी 2024-25 चा एलिट ग्रुप अ सामना 23 जानेवारीपासून मुंबईतील शरद पवार क्रिकेट अकादमीमध्ये खेळला जात आहे. हा सामना मुंबई आणि जम्मू आणि काश्मीर यांच्यात खेळला जात आहे. शुक्रवारी झालेल्या या सामन्यात एक अनोखी घटना पाहिली मिळाली. या घटनेमुळे स्थानिक क्रिकेटमधील पंचांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद झाल्यानंतर पाच मिनिटांनी पॅव्हेलियनमधून परत बोलावण्यात आले.
अजिंक्य रहाणे पॅव्हेलियनमध्ये गेला तरी परत का बोलावण्यात आले?
खरंतर, दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे आऊट झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला. पण पाच मिनिटांनी पुन्हा त्याला मैदानात बोलावण्यात आले. तिसऱ्या पंचांनी गोलंदाज उमर नझीरच्या नो-बॉलची पुष्टी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. ही घडना 25व्या षटकात घडली, जेव्हा नाझीरचा एक शॉर्ट बॉल रहाणेच्या बॅटच्या कडेला लागला आणि विकेटकीपरच्या हातात गेला. पंचांनी लगेच त्याला आऊट घोषित केले आणि रहाणे पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याच्या जागी शार्दुल ठाकूर फलंदाजीला आला.
पण सामन्यात ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा पंचांना तिसऱ्या पंचांकडून माहिती मिळाली की, नाझीरने नो बॉल टाकला आहे. यानंतर पंचांनी शार्दुल ठाकूरला परत पाठवले आणि रहाणेला पुन्हा क्रीजवर येण्यास सांगितले. रहाणे जो आधीच पॅव्हेलियनमधून बाहेर पडला होता, तो थोडा गोंधळला. रहाणे पुन्हा आल्यानंतर पंच त्याला नो-बॉल तपासेपर्यंत थांब असं सांगितल्याचं सांगताना दिसले. रहाणेने पण ते ऐकले नव्हते.
दरम्यान या घटनांच्या बऱ्याच चर्चा झाल्या. पण,कर्णधार रहाणेला मिळालेल्या जीवदानाचा जास्त फायदा घेता आला नाही. उमर नाजीरनेच त्याला पुढच्या षटकात आऊट केले. रहाणे दुसऱ्या डावात 44.44 च्या स्ट्राईक रेटने 16 चेंडूत 36 धावा काढल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतला.
हे ही वाचा -