James Anderson Records: इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यावर्षी जुलैमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर तो अखेरची कसोटी खेळणार आहे. जेम्स अँडरसन 2003 मध्ये इंग्लंडकडून पहिल्यांदा कसोटी खेळला होता. अशाप्रकारे जेम्स अँडरसनची 22 वर्षांची कारकीर्द संपणार आहे. (James Anderson to retire after home summer)
187 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त जेम्स अँडरसनने 194 वनडे आणि 19 टी-20 सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. आता हा खेळाडू वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्सवर शेवटची कसोटी खेळणार आहे. तथापि, आज आपण जेम्स अँडरसनचे असे 5 विश्वविक्रम पाहणार आहोत जे मोडणे जवळपास अशक्य आहे.
जेम्स अँडरसनचे हे विक्रम मोडणे अशक्य-
जेम्स अँडरसनच्या नावावर टेस्ट फॉरमॅटमध्ये 700 विकेट्स आहेत. कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत जेम्स अँडरसन पहिल्या स्थानावर आहे. जेम्स अँडरसन व्यतिरिक्त इतर कोणत्याही वेगवान गोलंदाजाने कसोटी फॉर्मेटमध्ये 650 बळींचा टप्पा ओलांडलेला नाही. जेम्स अँडरसनपेक्षा फक्त मुथय्या मुरलीधरन आणि शेन वॉर्न यांच्याकडे जास्त विकेट आहेत आणि दोघेही फिरकीपटू आहेत. याशिवाय जेम्स अँडरसन हा सर्वात जास्त कसोटी सामने खेळणारा वेगवान गोलंदाज आहे. जेम्स अँडरसन व्यतिरिक्त फक्त स्टुअर्ट ब्रॉड 150 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळू शकला.
जेम्स अँडरसन कसोटीत सर्वाधिक धावा करणारा गोलंदाज-
जेम्स अँडरसन हा देखील कसोटीत सर्वाधिक धावा करणारा गोलंदाज आहे. अलीकडेच भारताविरुद्धच्या मालिकेत जेम्स अँडरसनने भारताचा माजी दिग्गज अनिल कुंबळेला मागे टाकले होते. कुंबळेने आपल्या कारकिर्दीत 18355 तर अँडरसनने 18569 धावा दिल्या होत्या. याशिवाय अँडरसनने यष्टिरक्षक झेलच्या मदतीने कसोटीत 197 बळी घेतले आहेत. यष्टिरक्षकाकडून झेल देऊन सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जेम्स अँडरसन अव्वल स्थानावर आहे.
कसोटीत सर्वाधिक चेंडू टाकणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत अव्वल-
या विक्रमांव्यतिरिक्त, जेम्स अँडरसन हा वेगवान गोलंदाज आहे ज्याने कसोटीत सर्वाधिक चेंडू टाकले आहेत. आतापर्यंत त्याने आपल्या कारकिर्दीत 39877 चेंडू टाकले आहेत. वेगवान गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर जेम्स अँडरसननंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्टुअर्ट ब्रॉडने 33698 चेंडू टाकले आहेत.