Birmingham 2022 Commonwealth Games: बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत (WG 2022) सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंनी शनिवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेतली. मोदींनी या खेळाडूंचा गौरव केला. पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या या सोहळ्यास कुस्ती, वेटलिफ्टिंगह बॉक्सिंग, क्रिकेट, बॅडमिंटन आणि टेबल टेनिसपटू उपस्थित होते. दरम्यान, नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं (Harmanpreet Kaur) मोठं वक्तव्य केलं. देशाच्या पंतप्रधानांकडून प्रेरणा मिळणं महत्त्वाचं आहे, असं ती म्हणाली.


हरमनप्रीत कौर काय म्हणाली?
"ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमच्याशी संवाद साधत होते. त्यावेळी संपूर्ण देश भारतीय महिला क्रिकेट संघाला पाठिंबा दर्शवत असल्याचं जाणवत होतं. देशाच्या पंतप्रधानांकडून प्रोत्साहन मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे."


भारतीय खेळाडूंची कामगिरी भावी पिढीसाठी प्रेरणादायी- मोदी
भारतीय खेळाडूंनी बर्मिगहॅम येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्यपदकांसह एकूण 61 पदकं जिंकली आहेत. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत केलेली कामगिरी भावी पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी असल्याचंही पंतप्रधान मोदी म्हणाले.


कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतासाठी पदकं जिकलेले खेळाडू-


सुवर्णपदक - 22: मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना (पीपी), नीतू घणघस, अमित पंघल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरत कमल-श्रीजा अकुला, पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, सात्विक-चिराग, शरथ कमल.


रौप्यपदक - 16: संकेत सरगर, बिंदियाराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियांका, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरत-साथियान, भारतीय महिला क्रिकेट संघ, सागर, पुरुष हॉकी संघ. 


कांस्यपदक - 23: गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला संघ, संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव, घोषाल-दीपिका, श्रीकांन किदाम्बी, त्रिशा- गायत्री, साथियान.



हे देखील वाचा-