Ishan Kishan Record: भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चटोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. या सामन्यात भारताचा युवा सलामीवीर ईशान किशननं (Ishan Kishan) मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात जलद 150 धावा करणारा तो फलंदाज ठरलाय.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि दीपक चाहर यांना विश्रांती देण्यात आलीय. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दोघांनाही दुखापत झाली होती. त्यांच्याऐवजी ईशान किशन आणि कुलदीप यादवला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलं. या मिळालेल्या संधीचं ईशान किशनं सोनं करून दाखवलं आहे.
ट्वीट-
ईशान किशनचे अनेक विक्रम
- एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीयांकडून सर्वात जलद 150 धावा
- बांगलादेशविरुद्ध एकदिवसी सामन्यात भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज
- बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय सामन्यात भारतीयांची सर्वोच्च धावसंख्या
- भारतासाठी विकेटकीपर म्हणून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
भारताची प्लेईंग इलेव्हन:
शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/ विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक
बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन:
अनामूल हक, लिटन दास (कर्णधार), यासिर अली, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकिपर), महमुदुल्ला, अफिफ हुसैन, मेहिदी हसन मिराझ, इबादोत हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद
हे देखील वाचा-