IND vs BAN 3rd ODI: चट्टोग्रामच्या (Chattogram) झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील तिसरा सामना खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशच्या संघानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघानं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-0 असा पराभव स्वीकारावा लागलाय. या मालिकेतील तिसरा आज चटोग्राम येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. 

ट्वीट-

 

हेड टू हेड रेकॉर्डभारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 38 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. आजवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात भारताचं पारडं दिसलंय.  भारतानं 30 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, बांगलादेश संघाला फक्त 7 सामने जिंकता आले आहेत. तर एक सामना अनिर्णीत राहिला आहे.

भारत मालिकेत 2-0 नं पिछाडीवरनाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशच्या संघानं महेंदी हसन शतकी आणि महमूदुल्लाहच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 षटकात सात विकेट्स गमावून भारतासमोर 272 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतीय संघ निर्धारित 50 षटकांत 266 धावापर्यंतच मजल मारू शकला. भारतानं हा सामना पाच धावांनी गमावला. या मालिकेतील पहिला सामना गमावल्यानंतर भारताला कोणत्याही परिस्थितीत हा सामना जिंकणं गरजेचं होतं. परंतु, बांगलादेशच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. अखेरच्या काही षटकात फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दुखापतग्रस्त रोहित शर्मानं सामना फिरवण्याचा प्रयत्न केला. परंतु, भारताला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. 

भारताची प्लेईंग इलेव्हन:शिखर धवन, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/ विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक

बांगलादेशची प्लेइंग इलेव्हन:अनामूल हक, लिटन दास (कर्णधार), यासिर अली, शकीब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकिपर), महमुदुल्ला, अफिफ हुसैन, मेहिदी हसन मिराझ, इबादोत हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद.

हे देखील वाचा-