Latest IPL Points Table 2022 : आयपीएलचे आतापर्यंत 12 सामने झाले आहेत. कोलकाता, पंजाब, लखनौ आणि चेन्नई संघाचे प्रत्येकी तीन तीन सामने झाले आहेत. इतर संघाचे प्रत्येकी दोन दोन सामने झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या सामन्यात संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले आहे. तर मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद संघ तळाशी आहेत. 

राजस्थान, कोलकाता, गुजरात, पंजाब आणि लखनौ या संघाचे प्रत्येकी चार गुण आहेत. पण सरस नेट रनरेटच्या जोरावर राजस्थान संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले आहे. कोलकाता संघ दुसऱ्या तर गुजरात संघ तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या मुंबई संघातील ईशान किशनने ऑरेंज कॅपमध्ये अव्वल स्थान पटाकवले आहे. तर पर्पल कॅप कोलकाताच्या उमेश यादवकडे आहे. 

पाहा गुणतालिका.....

क्रमांक संघ सामने विजय पराभव नेट रन रेट गुण
1 राजस्थान 2 2 0 2.100 4
2 कोलकाता 3 2 1 0.843 4
3 गुजरात 2 2 0 0.495 4
4 पंजाब 3 2 1 0.238 4
5 लखनौ 3 2 1 0.193 4
6 दिल्ली 2 1 1 0.065 2
7 बेंगलोर 2 1 1 -0.048 2
8 मुंबई 2 0 2 -1.029 0
9 चेन्नई 3 0 3 -1.251 0
10 हैदराबाद 2 0 2 -1.825 0

फलंदाजीत ईशान किशन याने दोन सामन्यात खोऱ्याने धावा काढल्या आहेत. ईशान आणि बटलर यांच्या सारख्याच धावा आहेत. पण ईशान किशनचा स्ट्राईक रेट चांगला असल्यामुळे ऑरेंज कॅपचा मानकरी ठरलाय.

क्रमांक फलंदाज सामने धावा
1 इशान किशन 2 135
2 जोस बटलर 2 135
3 दीपक हुडा 3 119

वेगवान गोलंदाज उमेश यादव याने पर्पल कॅपवर नाव कोरलेय.... 

क्रमांक गोलंदाज सामने विकेट
1 उमेश यादव 3 8
2 आवेश खान  3 7
3 राहुल चाहर 3 6

हे देखील वाचा- 

मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live