IPL Player Auction 2025 : आयपीएल 2025 ची रिटेन्शन लिस्ट बाहेर आल्यानंतर अनेक स्टार खेळाडूंना त्यांच्या संघांनी सोडले आहे. डीसीने ऋषभ पंतला सोडले, केकेआरने श्रेयस अय्यरला सोडले, एलएसजीने केएल राहुलला सोडले. राजस्थान रॉयल्सने युझवेंद्र चहलला सोडवून सर्वांना आश्चर्यचकित केले. आता हे सर्व खेळाडू आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाचा भाग असतील. 


आयपीएल 2025 चा मेगा लिलाव यावेळी सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात होणार आहे. ज्यासाठी 24 आणि 25 नोव्हेंबर ठेवण्यात आले आहेत. स्टार खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सर्व फ्रँचायझींमध्ये चांगली स्पर्धा पाहिला मिळेल. दरम्यान, पंत, राहुल नाही तर मेगा लिलावात मुंबई इंडियन्स युझवेंद्र चहलवर खर्च करू शकते अशी बातमी येत आहे.  


युजवेंद्र चहल हा टी-20 क्रिकेटचा महान गोलंदाज मानला जातो. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चहलने भारतासाठी सर्वाधिक विकेट घेतल्या आहेत. याशिवाय राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी चहलची कामगिरी उत्कृष्ट आहे. मात्र यावेळी राजस्थान रॉयल्सने या गोलंदाजाला सोडले आहे.






यानंतर मुंबई इंडियन्स लिलावात चहरवर पैशांचा पाऊस पाडताना दिसू शकते. चहलला टी-20 क्रिकेटचा खूप अनुभव आहे आणि तो सतत आयपीएलही खेळत आहे. याशिवाय, आपला फिरकी विभाग आणखी मजबूत करण्यासाठी, मुंबई इंडियन्स या खेळाडूवर मोठा सट्टा खेळू शकतो.


चहलची टी-20 कारकीर्द


युझवेंद्र चहलने टीम इंडियासाठी आतापर्यंत 80 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने शानदार गोलंदाजी करत 96 विकेट्स घेतल्या. या काळात चहलची सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 42 धावांत 6 विकेट्स घेणे. मात्र, चहलला बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियात संधी मिळत नाहीये. याशिवाय चहलने आतापर्यंत आयपीएलमध्ये 160 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने वेगवेगळ्या संघांकडून खेळताना 205 विकेट घेतल्या आहेत.






हे ही वाचा -


India A vs Australia A : टीम इंडियाला लागले ग्रहण... ऑस्ट्रेलियाकडून भारताला व्हाईटवॉश, बॉर्डर-गावसकर ट्रॉफीआधी मोठा धक्का


सूर्या दादाशी पंगा तर मैदानात दंगा... IND vs SA मॅचमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! नेमकं घडलं काय? पाहा व्हिडीओ