Most expensive uncapped player in the IPL Auction history : आयपीएलच्या ऑक्शनमध्ये यंदा इतिहास घडला आहे. प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा हे दोघेही आयपीएलमधील सर्वात महागडे अनकॅप्ड खेळाडू ठरले आहेत. अवघ्या 30 लाख रुपयांच्या मूळ किंमतीत ऑक्शनमध्ये उतरलेल्या या दोन्ही खेळाडूंवर फ्रँचायझींनी अक्षरशः पैशांचा पाऊस पाडला.
CSKने प्रशांत वीरसाठी मोजले 14.20 कोटी (IPL Auction 2026 CSK Prashant Veer)
प्रशांत वीरसाठी सुरुवातीला चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. त्यानंतर राजस्थान रॉयल्सनेही बोलीत उडी घेतली, ज्यामुळे प्रशांतवरची बोली झपाट्याने वाढत गेली. अखेर CSKने प्रशांत वीरला तब्बल 14.20 कोटी रुपयांना खरेदी केले. या खरेदीसह प्रशांत वीर आयपीएल इतिहासातील सर्वाधिक किमतीचा अनकॅप्ड खेळाडू ठरला.
कार्तिक शर्मासाठीही CSKने मोजले 14.20 कोटी (IPL Auction 2026 CSK Kartik Sharma)
त्याचवेळी कार्तिक शर्मा यांच्यासाठीही ऑक्शनमध्ये तितकीच रंगत दिसून आली. CSK आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात कार्तिकसाठी चुरस झाली आणि काही वेळातच बोली 11 कोटी रुपयांच्या पुढे गेली. अखेर CSKने कार्तिक शर्मालाही 14.20 कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले.
IPL ऑक्शनच्या इतिहासातील सर्वाधिक किमतीचे अनकॅप्ड खेळाडू
- प्रशांत वीर – चेन्नई सुपर किंग्ज – ₹14.20 कोटी (2025)
- कार्तिक शर्मा – चेन्नई सुपर किंग्ज – ₹14.20 कोटी (2025)
- आवेश खान – लखनऊ सुपर जायंट्स – ₹10 कोटी (2022)
- कृष्णप्पा गौतम – चेन्नई सुपर किंग्ज – ₹9.25 कोटी (2021)
- शाहरुख खान – पंजाब किंग्ज – ₹9 कोटी (2022)
- राहुल तेवतिया – गुजरात टायटन्स – ₹9 कोटी (2022)
- कृणाल पांड्या – मुंबई इंडियन्स – ₹8.80 कोटी (2018)
औकिब नबी – दिल्ली कॅपिटल्स – ₹8.40 कोटी (2025)
वरुण चक्रवर्ती – किंग्स इलेव्हन पंजाब – ₹8.40 कोटी (2019)
हे ही वाचा -