IPL Auction 2026 Cameron Green: ऑस्ट्रेलियाच्या कॅमरॉन ग्रीनवर (Cameron Green) आयपीएलच्या लिलावात (IPL Auction 2026) तगडी बोली लागली. कॅमरॉन ग्रीनची 2 कोटी रुपये मूळ किंमत होती. कॅमरॉन ग्रीनला खरेदी करण्यासाठी चेन्नई आणि कोलकाता भिडले. यावेळी 25.20 कोटी रुपयांना कोलकाताने खरेदी केली. आता कॅमरॉन ग्रीन आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. 

Continues below advertisement

Continues below advertisement

दक्षिण अफ्रिकेच्या डेव्हिड मिलरला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांना खरेदी केले. तर भारतीय क्रिकेटचा फलंदाज पृथ्वी शॉ अनसोल्ड राहिला. आयपीएल 2026 चा मिनी लिलाव (IPL Mini Auction 2026 Live) अबू धाबी येथे सुरु आहे. आयपीएल लिलावासाठी सर्व संघांकडे मिळून एकूण 237.55 कोटी रुपयांचा पर्स उपलब्ध आहे. मिनी ऑक्शनमध्ये कमाल 77 खेळाडू खरेदी करता येणार असून, एकूण 359 खेळाडू लिलावात उतरले आहेत. यापैकी जास्तीत जास्त 31 परदेशी खेळाडूंनाच करार मिळू शकतो, तर लिलावात 110 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. (IPL Auction 2026)

संबंधित बातमी:

IPL 2026 Auction Live: कॅमरॉन ग्रीन रेकॉर्ड ब्रेक बोली; सगळे संघ तुटून पडले, कोणी खरेदी केले?