IPL 2026 Auction: आयपीएल 2026 चा मिनी लिलाव (IPL Mini Auction 2026) अबू धाबी येथे सुरु आहे. ऑस्ट्रेलियाच्या कॅमरॉन ग्रीनवर (Cameron Green) आयपीएलच्या लिलावात (IPL Auction 2026) तगडी बोली लागली. कॅमरॉन ग्रीनची 2 कोटी रुपये मूळ किंमत (Cameron Green) होती. कॅमरॉन ग्रीनला खरेदी करण्यासाठी चेन्नई आणि कोलकाता भिडले. यावेळी 25.20 कोटी रुपयांना कोलकाताने खरेदी केली. आता कॅमरॉन ग्रीन आयपीएलच्या इतिहासातील सगळ्यात महागडा विदेशी खेळाडू ठरला आहे. तर अनेक दिग्गज खेळाडू आतापर्यंत (सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत) अनसोल्ड राहिलेले आहे. (IPL Mini Auction 2026)

Continues below advertisement

IPL 2026 च्या लिलावात  आतापर्यंत न विकलेल्या खेळाडूंची यादी- (IPL Auction 2026 Unsold Player List)

  1. जेक फ्रेझर मॅकगुर्क
  2. पृथ्वी शॉ
  3. डेव्हॉन कॉन्वे
  4. सरफराज खान
  5. गस ऍटकिन्सन
  6. रचिन रवींद्र
  7. लियाम लिव्हिंगस्टोन
  8. विआन मुल्डर
  9. शीकर भरत
  10. जॉनी बेअरस्टो
  11. रहमुल्ला गुरबाज
  12. जेमी स्मिथ
  13. दीपक हुडा

मथिशा पाथिरानाने IPL चं ऑक्शन गाजवलं- (Matheesha Pathirana IPL Mini Auction 2026)

आयपीएलच्या गेल्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाने आयपीएलचं ऑक्शन गाजवलं. मथिशा पाथिरानाला कोलकाता नाईट रायडर्सने 18 कोटी रुपयांना खरेदी केले. चेन्नई सुपर किंग्सने मथिशा पाथिरानाला संघातून रिलीज केले होते. 

आरसीबीने व्यंकटेश अय्यरला 7 कोटी रुपयांना विकत घेतले- (Venkatesh Iyer ipl 2026)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने व्यंकटेश अय्यरला 7 कोटी रुपयांना विकत घेतले. व्यंकटेश अय्यरची मूळ किंमत 2 कोटी होती.

संबंधित बातमी:

IPL Auction 2026 Cameron Green: कॅमरॉन ग्रीनने IPL चे सगळे रेकॉर्ड मोडले; सगळ्यात महागडा विदेशी खेळाडू ठरला, KKR ने किती कोटी रुपये मोजले?