Quinton De Kock IPL 2026 Auction : आयपीएल 2026 साठी सुरू असलेल्या मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) मोठा डाव खेळत दक्षिण आफ्रिकेचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. अबू धाबी येथे सुरू असलेल्या या मिनी ऑक्शनमध्ये (IPL Auction 2026) मुंबई इंडियन्सने डी कॉकला त्याच्या बेस प्राइस 1 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले.

Continues below advertisement

क्विंटन डी कॉक मागील हंगामात (आयपीएल 2025) कोलकाता नाइट रायडर्स संघाचा भाग होता. मात्र आता तो पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, डी कॉक यापूर्वीही मुंबई इंडियन्सकडून खेळला असून त्याचा संघासोबतचा अनुभव यशस्वी राहिला आहे.

रोहित शर्मासोबत मिळाला तगडा पार्टनर

Continues below advertisement

आयपीएल 2026 साठीचे मिनी ऑक्शन सध्या अबू धाबीमध्ये सुरू असून यामध्ये सुमारे 350 खेळाडूंवर बोली लावली जात आहे. या ऑक्शनमध्ये क्विंटन डी कॉकने स्वतःची बेस प्राइस 1 कोटी रुपये ठेवली होती. त्याचे नाव पुकारताच मुंबई इंडियन्सने कोणतीही वेळ न घालवता थेट बेस प्राइसवर बोली लावत त्याला आपल्या संघात घेतले. तो रोहित शर्मासोबत सलामीला खेळू शकतो.

क्विंटन डी कॉकचा दमदार आयपीएल कारकिर्द

क्विंटन डी कॉकची आयपीएलमधील कारकिर्द अत्यंत प्रभावी ठरली आहे. त्याने आतापर्यंत 115 सामने खेळत 3309 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतके आणि 24 अर्धशतके यांचा समावेश आहे. डी कॉकचा सरासरी 30.64 असून स्ट्राइक रेट 134.02 आहे.

त्याने 2019 आणि 2020 या दोन हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळताना संघाला आयपीएलचे जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. डी कॉकने आतापर्यंत सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघांचे प्रतिनिधित्व केले आहे.

नाबाद 140 धावांची ऐतिहासिक खेळी

क्विंटन डी कॉकचा आयपीएलमधील सर्वोच्च स्कोअर नाबाद 140 धावा असा आहे. ही खेळी त्याने 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळताना कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध साकारली होती. आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर, रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करत डी कॉक पुन्हा एकदा आपल्या फटकेबाजीने आयपीएलमध्ये धमाल उडवेल, अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा -

IPL Auction 2026 Cameron Green: कॅमरॉन ग्रीनने IPL चे सगळे रेकॉर्ड मोडले; सगळ्यात महागडा विदेशी खेळाडू ठरला, KKR ने किती कोटी रुपये मोजले?