IPL 2026 Auction : लिलाव संपला, कोट्यवधींची उधळण; कॅमेरून ग्रीन टॉपवर, प्रशांत वीर–कार्तिक शर्माचा विक्रम, कोण कोणत्या संघात? जाणून घ्या सर्वकाही

IPL 2026 Auction: आयपीएल 2026 चा मिनी लिलाव अबू धाबी येथे सुरु आहे. मिनी ऑक्शनमध्ये कमाल 77 खेळाडू खरेदी करता येणार असून, एकूण 359 खेळाडू लिलावात उतरले आहेत.

Advertisement

मुकेश चव्हाण Last Updated: 16 Dec 2025 09:47 PM

पार्श्वभूमी

IPL 2026 Auction: आयपीएल 2026 चा मिनी लिलाव (IPL Mini Auction 2026 Live) अबू धाबी येथे सुरु आहे. आयपीएल लिलावासाठी सर्व संघांकडे मिळून एकूण 237.55 कोटी रुपयांचा पर्स उपलब्ध आहे....More

IPL 2026 Auction : लिलाव संपला, कोट्यवधींची उधळण; कॅमेरून ग्रीन टॉपवर, प्रशांत वीर–कार्तिक शर्माचा विक्रम, कोण कोणत्या संघात? जाणून घ्या सर्वकाही




आयपीएल 2026 हंगामासाठी झालेली खेळाडूंची मिनी लिलाव प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे.


एकूण 77 जागांसाठी सर्व 10 फ्रेंचायझींनी जोरदार बोली लावली. विशेष बाब म्हणजे या लिलावात उपलब्ध असलेल्या सर्वच 77 जागा भरल्या गेल्या असून, आगामी हंगामासाठी सर्व संघ पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहेत.


खरेदी झालेल्या 77 खेळाडूंमध्ये 29 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.


या मिनी लिलावात सर्व 10 संघांनी मिळून तब्बल 215.45 कोटी रुपयांची उधळण केली.


या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला कॅमेरन ग्रीन. कोलकाता नाइट रायडर्स (केकेआर) संघाने त्याला 25.20 कोटी रुपयांची मोठी बोली लावत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. त्याचबरोबर केकेआरने वेगवान गोलंदाज मथीशा पथीरानालाही 18 कोटी रुपये मोजत संघात घेतले.


मिनी लिलावात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते अनकॅप्ड खेळाडू कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर यांनी.


आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक किमतीला विकले गेलेले अनकॅप्ड खेळाडू म्हणून या दोघांनी विक्रम केला.


चेन्नई सुपर किंग्सने कार्तिक आणि प्रशांत या दोघांनाही प्रत्येकी 14.20 कोटी रुपयांना खरेदी केले.


विशेष म्हणजे या दोघांचाही मुळ किंमत केवळ 30 लाख रुपये होती.





© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.