IPL 2025 Mega Auction : माजी कर्णधार एमएस धोनीची गणना आज भारतातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. त्याने भारताला टी-20 वर्ल्ड कप, एकदिवसीय वर्ल्ड कप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली आहे. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच नाही तर धोनीने आयपीएलमध्येही आपला ठसा उमटवला आहे. त्याने सीएसकेसाठी पाच वेळा विजेतेपद पटकावले आणि यलो आर्मीसाठी 2 चॅम्पियन्स लीग ट्रॉफीही जिंकली.


धोनी झारखंडमधून आला आहे, आणि तसाच झारखंडच्या एका यष्टीरक्षक फलंदाजालाही आयपीएल 2024 मध्ये आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाली. मात्र एका चुकीमुळे या खेळाडूला आपले कौशल्य जगाला दाखवण्याची संधी मिळाली नाही.


आयपीएल 2024 साठी मिळाली संधी


आयपीएल 2024 च्या लिलावात अनेक युवा खेळाडूंवर फ्रँचायझींनी बोली लावली होती. यामध्ये झारखंडचा युवा यष्टिरक्षक फलंदाज रॉबिन मिंजचे नावही सामील होते. 2022 च्या विजेत्या गुजरात टायटन्सने त्याच्यावर सट्टा खेळला होता आणि त्याला आपल्या संघाचा भाग बनवण्यासाठी करोडो रुपये खर्च केले. रॉबिन मिंजला गुजरातने आयपीएल 2024 साठी 3.6 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आयपीएल खेळणारा तो पहिला आदिवासी खेळाडू बनणार होता. पण नशिबाला हे मान्य नव्हते.


फक्त एक चूक आणि सर्वकाही गमावले


आयपीएल 2024 च्या लिलावात कोट्यावधी रुपयांची बोली लागल्यानंतर रॉबिन मिंजचे कुटुंब खूप आनंदी होते. फक्त एक चूक आणि त्याने सर्वकाही गमावले. खरंतर, रॉबिन मिंज रांचीमध्ये बाईक चालवत होता. त्यावेळी वेग जास्त असल्याने त्याचे नियंत्रण सुटले. आणि त्याची गाडी दुसऱ्या दुचाकीला धडकली. त्यांच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे मिंज आयपीएल 2024 मध्ये सहभागी होऊ शकला नाही.


झारखंडमध्ये लोक मिंजला धोनीच्या नावाने हाक मारतात. कारण हा डावखुरा यष्टिरक्षक फलंदाज धोनीप्रमाणेच लांब षटकार मारण्यात पटाईत आहे. आयपीएल 2025 च्या लिलावात मिंजला बोली लावली जाते की नाही हे पाहणे मनोरंजक असेल. 


हे ही वाचा -


Ind vs Ban : सचिनचा विक्रम मोडणाऱ्या मुशीरने 'या' 2 खेळाडूंचं वाढवलं टेन्शन! टीम इंडियात होणार का एंट्री?


Shubman Gill : कधी सारा तेंडुलकर तर कधी सारा अली खान, टीम इंडियाच्या 'प्रिन्स' शुभमनचं 'या' 4 मुलींशी जोडलं गेलं नाव पण...


Moeen Ali Retirement : विराटला 10 वेळा आऊट करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती, सांगितलं मोठं कारण