Shubman Gill Records : टीम इंडियासाठी वयाच्या 19 व्या वर्षी पदार्पण करणारा शुभमन गिल आज 8 सप्टेंबर रोजी आपला 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. 1999 साली पंजाबमध्ये जन्मलेल्या या खेळाडूने फार कमी वेळात भारतीय क्रिकेट संघात अनेक यश संपादन केले आहे. त्यांच्या नावावर अनेक विशेष विक्रम नोंदवले गेले आहेत. अशा परिस्थितीत गिल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या यशावर एक नजर टाकूया.


2018 साली झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत शुभमन गिलने भारतासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. सेमीफायनलमध्येही त्याने पाकिस्तानविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. 19 वर्षाखालील वर्ल्ड कप 2018 मध्ये गिल टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्यानंतर त्याची विराट कोहलीशीही तुलना केली जात होती. गिलची खेळण्याची शैलीही कोहलीच्या खेळाशी जुळते. अंडर-19 क्रिकेटमधील यशस्वी कामगिरीनंतर गिल आयपीएल फ्रँचायझी केकेआरच्या नजरेत आला. त्याला मोठी रक्कमही मिळाली. 2018 मध्ये, केकेआरने त्याला 1.8 कोटी रुपये खर्च करून त्यांच्या टीमचा भाग बनवले.


गिलच्या नावावर अनेक खास रेकॉर्ड


31 जानेवारी 2019 रोजी न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडियासाठी पहिला सामना खेळणारा गिल आज यशस्वी सलामीवीर म्हणून गणला जातो. वयाच्या 25 व्या वर्षी गिलने अनेक विक्रम मोडले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वनडे फॉरमॅटमध्ये दुहेरी शतक झळकावणारा गिल हा सर्वात तरुण खेळाडू आहे. याशिवाय सर्व फॉरमॅटमध्ये सर्वात कमी वयात शतक ठोकण्याचा विक्रमही गिलच्या नावावर आहे. गिल हा आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू आहे. एवढेच नाही तर गिलने भारतीय संघासाठी सर्वात तरुण टी-20 शतकही ठोकले आहे.


कारकीर्दीत चमकदार कामगिरी


शुभमन गिलने आतापर्यंत 25 कसोटी सामन्यांमध्ये 35.52 च्या सरासरीने 4 शतके आणि 6 अर्धशतकांसह 1492 धावा केल्या आहेत. 47 एकदिवसीय सामन्यांमध्ये या खेळाडूने 58.20 च्या उत्कृष्ट सरासरीने 2328 धावा केल्या आहेत, तर 21 टी-20 सामन्यांमध्ये या खेळाडूच्या नावावर 578 धावा आहेत.


हे ही वाचा -


Moeen Ali Retirement : विराटला 10 वेळा आऊट करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूने अचानक घेतली निवृत्ती, सांगितलं मोठं कारण


IPL 2025 च्या हंगामात मोठ्या घडामोडी, पाच संघांचे कॅप्टन बदलणार, शुभमन गिल ते डुप्लेसिस यादीत आणखी कोण असणार?


Ind vs Ban : तीन 'अनकॅप्ड' खेळाडूंचे नशीब फळफळणार? दुलीप ट्रॉफीच्या कामगिरीमुळे कर्णधार रोहित देणार संधी...