India Predicted Playing XI vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूरच्या ग्रीन पार्कवर खेळण्यात आलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित ठरलाय. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना 3 डिसेंबरपासून खेळला जाणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध मुंबई खेळण्यात येणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी सज्ज झालीय. कसोटी मालिकेवर नाव कोरण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणं गरजेचं आहे. कानपूरमध्ये फिरत्या खेळपट्टीवर न्यूझीलंडच्या संघानं चांगली कामगिरी करून दाखवलीय. यामुळं न्यूझीलंडला पराभूत करणं सोपं वाटत नाही. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला आपली प्लेइंग इलेव्हन अत्यंत काळजीपूर्वक निवडावी लागणार आहे. कोहलीच्या आगमनामुळं भारतीय संघाची फलंदाजी अधिक मजबूत झालीय.
भारतासाठी शभमन गिल आणि केएस भरत डावाची करू शकतात. पहिल्या कसोटी सामन्यात विकेटकिपर वृद्धमान शाहाला दुखापत झालीय. यामुळं तो दुसऱ्या कसोटीतून मुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच्या जागेवर केएल भरतला पदार्पणाची संधू मिळू शकते. कोहलीच्या आगमनामुळं मयंक अग्रवालला प्लेइंग इलेव्हनमधून वगळलं जाऊ शकतं. चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. विराट कोहली कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो.
कानपूरमध्ये कसोटी पदार्पण करणारा श्रेयस अय्यर पुन्हा एकदा पाचव्या क्रमांकावर आक्रमक खेळी करताना दिसू शकतो. दुसरीकडे, फॉर्ममध्ये असलेला उपकर्णधार अजिंक्य रहाणे सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. यानंतर संघात तीन अष्टपैलू खेळाडू असतील. ज्यात रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि आर अश्विन यांचा समावेश असेल. हे तिन्ही खेळाडू उत्कृष्ट फिरकीपटू आहेत. तसेच फलंदाजीही चांगली करतात. यांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केल्यानं संघाच्या फलंदाजी आणखी मजबूत होईल.
कानपूर कसोटी सामन्यात इशांत शर्माकडून खराब कामगिरी पाहायला मिळाली. ज्यामुळं त्याच्या जागेवर मोहम्मद सिराजची निवड होऊ शकते. भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचीही शक्यता आहे. ज्यामुळं अक्षर पटेलला वगळलं जाऊ शकतं. परंतु, कानपूर कसोटीत त्यानं ज्याप्रकारे कामगिरी केलीय. त्यावर नजर टाकली तर, अक्षर पटेल संघातून बाहेर जाण्याची शक्यता फार कमी आहे.
भारताचा संभाव्य इलेव्हन संघ-
शुभमन गिल, केएस भरत (विकेटकीपर), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कप्तान), श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, मो. सिराज/इशांत शर्मा, उमेश यादव.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- India Tour of South Africa 2021: भारताच्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर ऑमेक्रॉनचं सावट, बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
- 'अॅशेस'पूर्वी इंग्लंडसाठी आनंदाची बातमी, धाकड ऑलराऊंडर टीममध्ये परत, ऑस्ट्रेलियाची खैर नाही
- Anil Kumble On KL Rahul: पंजाब किंग्जनं केएल राहुलला का वगळलं? प्रशिक्षक अनिल कुंबळेंनी उघडलं गुपित