The Ashes 2021-22 : अॅशेस (Ashes Series) ही जगातील केवळ दोन देशात खेळवली जाणारी स्पर्धा असली तरी, तिची क्रेज मात्र जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये आहे. इंग्लंड (England Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया (Australian Cricket Team) या देशांमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा येत्या 8 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. 


दरम्यान या भव्य स्पर्धेपूर्वी अनेक गोष्टी घडत आहेत. नुकताच ऑस्ट्रेलिया संघाचं कर्णधारपद पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आलं. त्यानंतर आता ऑस्ट्रेलिया संघाच्या अडचणी अजून वाढणार आहेत. कारण इंग्लंडचा दिग्गज खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) संघात परतला आहे.
बेन स्टोक्सने या भव्य स्पर्धेपूर्वी स्वत:ला फिट केलं असून त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.



अॅशेसचं वेळापत्रक



  • पहिला कसोटी सामना -  8 डिसेंबर ते 12 डिसेंबर, गाबा मैदान, ब्रिस्बेन.

  • दुसरा कसोटी सामना -  16 डिसेंबर ते 20 डिसेंबर, ओव्हल मैदान, अॅडलाईड.

  • तिसरा कसोटी सामना -  26 डिसेंबर ते 30 डिसेंबर,  मेलबर्न मैदान, मेलबर्न 

  • चौथा कसोटी सामना - 05 जानेवारी ते 9 जानेवारी, सिडनी मैदान, सिडनी

  • पाचवा कसोटी सामना - 14 जानेवारी ते 18 जानेवारी, पर्थ मैदान, पर्थ  


संबधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha