IPL 2022 Auction: लखनौ आणि अहमदाबाद हे दोन नवे संघ यंदाच्या आयपीएल(IPL) हंगामापासून सहभागी होणार आहेत. त्यामुळे 8 च्या जागी आयपीएल स्पर्धा 10 संघ रंगणार आहे. लवकरच मेगा लिलावही (IPL Auction 2022) पार पडणार आहे. या लिलावापूर्वी जुन्या 8 संघांना जास्तीत जास्त चार खेळाडूंना कायम ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. प्रत्येक संघानी आपापल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मेगा लिलावापूर्वी नव्या दोन संघांनाही प्रत्येकी तीन खेळाडू खरेदी करता येणार आहे. अद्याप लखनौ आणि अहमदाबाद संघानी आपल्या खेळाडूंची नावे बीसीसीआयकडे दिलेली नाहीत. अता बीसीसीआयने दोन्ही संघाना खेळाडू निवडण्यासाठी 22 जानेवारीची मुदत दिली आहे.


आता VIVO जागी TATA IPL


ब्रिजेश पटेल यांनी आयपीएलच्या (IPL 2022) टायटल स्पॉन्सरबाबत ही महत्वाची घोषणा केली असून आयपीएलच्या आगामी हंगामात विवो ऐवजी टाटा ग्रुप टायटल स्पॉन्सर असणार आहे. लीगसोबतच्या प्रायोजकत्व करारासाठी विवोकडे काही वर्षे शिल्लक आहेत. परंतु या हंगामात टाटा मुख्य प्रायोजक राहतील. या लीगचे नाव आता टाटा आयपीएल असेल. विवोनं 2018 मध्ये वार्षिक 440 कोटी रुपये खर्चून शीर्षक हक्क विकत घेतले होते. गतवर्षी चायनीझ वस्तूंवरील बहिष्काराची मागणी लक्षात घेता बीसीसीआयनं विवोला माघार घेण्यास सांगितली होती आणि ड्रीम 11नं यूएईत झालेल्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले होते.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha