मुंबई : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटवर चर्चेसाठी एकत्र आले होते. यादरम्यान, विराटने आपल्या आयुष्याती असा एक किस्सा सांगितला, जो ऐकून चाहत्यांना धक्काच बसला. विराट आपल्या वडिलांबाबत एक किस्सा सांगताना म्हणाला की, टीममध्ये सिलेक्शन होण्यासाठी त्याच्या वडिलांनी लाच देण्यास नकार दिला होता. विराट त्यावेळी उत्तम खेळाडू होता, तरिदेखील त्याचं टीममध्ये सिलेक्शन करण्यात आलं नव्हतं. विराटने सांगितलं की, त्यावेळी स्टेट क्रिकेटमध्ये अनेक गोष्टी घडत असतं, अनेक घडणाऱ्या गोष्टी योग्य नव्हत्या.'



विराटने सांगितलं की, 'त्यावेळी माझ्यासोबतही अशीच एक घटना घडली होती. ज्यावेळी मला सांगण्यात आलं होतं की, तुमच्याकडे कितीही टॅलेंट असलं तिरीही त्याव्यतिरिक्तही तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागतात. माझे वडील 'प्रेम' फार मेहनती होते, त्यांनी रस्त्यावर असणाऱ्या दिव्यांखाली अभ्यास करून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला असून अत्यंत मेहनत घेतल्यानंतर ते वकील बनले होते. त्याआधी ते मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होते.' कोहली पुढे बोलताना म्हणाला की, 'जी व्यक्ती मेहनत करते, त्या व्यक्तीला लाच देण्याघेण्याची भाषा कधीच समजत नाही.'



भारतीय कर्णधार विराटने सांगितलं की, 'त्याच्या वडिलांचा शॉर्टकटवर कधीच विश्वास नव्हता. ते नेहमी मला मेहनत कर आणि स्वतःवर विश्वास ठेव, एवढचं सांगायचे. त्यांनी माझे कोच होते त्यांना सांगितलं होतं की, 'जर विराट स्वतःच्या मेहनतीने आणि टॅलेंटने खेळणार असेल, तर मी चुकीचं असं काहीही करण्यासाठी तयार नाही.' त्यानंतर जेव्हा माझं टीममध्ये सिलेक्शन झालं नव्हतं त्यावेळी मी खूप रडलो होतो.


विराट पुढे बोलताना म्हणाला की, 'त्यावेळी मला समजलं होतं की, हे जग कसं चालतं. जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर, तुम्हाला ते करावं लागेल, जे कोणीच करत नाही. अशातच तुम्ही फक्त मेहनतीवरच विश्वास ठेवू शकता. हे सगळं काही मी माझ्या वडिलांकडूनच शिकलो. मेहनत करावी आणि मेहनतीच्याच जोरावर आदर आणि पैसे कमवावे.'


संबंधित बातम्या : 


कोरोनानंतरही खेळाडू आणि चाहत्यांच्या मनात भीती कायम असेल : राहुल द्रविड


'माझ्यात अजूनही बरंच क्रिकेट शिल्लक', सुरेश रैनाला संघात पुनरागमन करण्याचा विश्वास


माझी पत्नी लियोनेल मेस्सीची फॅन, पण आमचा मेस्सी धोनीच : सुरेश रैना