IND W vs AUS W 3rd T20: मुंबईच्या (Mumbai) ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women vs Australia Women) तिसरा टी-20 सामना खेळवला जात आहे. सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी झाली असून त्यांनी 172 धावा करत 173 धावाचं आव्हान भारतासमोर ठेवलं आहे. एलिस पेरी हिने सर्वाधिक 75 धावा ऑस्ट्रेलियासाठी केल्या आहेत. आता फलंदाजीसाठी भारतीय महिला मैदानात उतरत आहेत.


सामन्यात सर्वात आधी नाणेफेक झाली असून भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मायदेशात सामना असल्याने ऑस्ट्रेलियाला कमी धावात रोखून निर्धारीत लक्ष्य पूर्ण करण्याचा भारताचा डाव होता. पण ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी दमदार फलंदाजी करत भारतासमोर एक तगडं लक्ष्य ठेवलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीने 30, ग्रेस हॅरिसने 41 तर एलिस पेरीने सर्वाधिक 75 धावा केल्या. इतर फलंदाजांना दुहेरी संख्याही गाठता आली नसली तरी या तिघींचं योगदान पुरेसं असल्यानं भारतासमोर एक आव्हानात्मक लक्ष्य ठेवण्यात ऑस्ट्रेलियाचा संघ यशस्वी ठरला आहे. भारताकडून दिप्ती शर्मा, देविका वैद्य, अंजली सरवाणी आणि रेणुका सिंह या चौघींनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या आहेत.






कशी आहे दोन्ही संघाची अंतिम 11?


भारतीय महिला संघ:


स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, अंजली सरवाणी, रेणुका ठाकूर सिंग, राजेश्वरी गायकवाड


ऑस्ट्रेलिया महिला संघ:

अ‍ॅलिसा हिली (यष्टीरक्षक/कर्णधार), बेथ मूनी, ताहलिया मॅकग्रा, अॅशलेग गार्डनर, एलिस पेरी, ग्रेस हॅरिस, अॅनाबेल सदरलँड, निकोला केरी, अलाना किंग, मेगन शट, डार्सी ब्राउन


भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात आजवर झालेल्या सामन्यांचा विचार करताआतापर्यंत 26 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाच्या संघानं 18 सामने जिंकले आहेत. तर, भारताला फक्त सात सामन्यात विजय मिळवता आलाय. यातील एक सामना अर्निर्णित ठरलाय. ही आकडेवारी पाहता ऑस्ट्रेलियाच्या संघाचं पारडं जडं दिसत आहे. 


हे देखील वाचा-


FIFA WC 2022 : फिफा विश्वचषकाचे केवळ चार सामने शिल्लक, गोल्डन बूटच्या शर्यतीत कोणते खेळाडू आघाडीवर