एक्स्प्लोर

INDvsNZ 1st ODI | श्रेयस अय्यरचं पहिलंच वनडे शतक, भारताचं न्यूझीलंडसमोर 348 धावांचं आव्हान

हेमिल्टनच्या सेडॉन पार्कमध्ये हा सामना खेळवण्यात येत आहे. मुंबईच्या श्रेयस अय्यरने न्यूझीलंड दौऱ्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात शतक झळकावलं. एकदिवसीय कारकीर्दीतलं त्याचं हे पहिलंच शतक आहे.

हेमिल्टन : भारत आणि न्यूझीलंडमधील तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेतील पहिला सामन्यात भारताने निर्धारित 50 षटकात चार विकेट्सच्या मोबदल्यात 347 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडसमोर विजयासाठी 348 धावांचं आव्हान आहे. श्रेयस अय्यरच्या दमदार शतक, केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 347 धावांची मजल मारली. हेमिल्टनच्या सेडॉन पार्कमध्ये हा सामना खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं. या एकदिवसीय सामन्यात पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवालला पदार्पणाची संधी दिली. याशिवाय कुलदीप यादव आणि केदार जाधवचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश झाला आहे. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या सलामीच्या जोडीने 50 धावांची भागीदारी रचली. आठव्या षटकात कॉलिन डी ग्रॅण्डहोमने भारताला पहिला झटका दिला. कॉलिन डी ग्रॅण्डहोमच्या गोलंदाजीवर टॉम लॅथमकडे झेल देत पृथ्वी शॉ बाद झाला. पृथ्वी शॉ 20 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. पृथ्वी शॉनंतर मयांक अग्रवालही बाद झाला. मयांक अग्रवाल नवव्या षटकात टिम साऊदीने टॉम ब्लंडेलकरवी झेलबाद केलं. मयांक अग्रवालने 32 धावा केल्या. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी भागीदारी रतली. 29व्या षटकात विराट कोहली बाद झाला. ईश सोढी विराटला बोल्ड करत भारताला तिसरा झटका दिला. त्याने 51 धावा केल्या. मुंबईच्या श्रेयस अय्यरने न्यूझीलंड दौऱ्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात शतक झळकावून भारतीय डावाला आकार दिला. श्रेयस अय्यरचं एकदिवसीय सामन्यातलं हे पहिलंच शतक आहे. त्याने 101 चेंडूंत शतक झळकावलं. त्याच्या या खेळीत 11 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. तो 107 धावा करुन बाद झाला. दुसरीकडे के ए राहुलने तीन चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 88 धावा केल्या. तर केदार जाधवने तीन चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने नाबाद 26 धावांचं योगदान दिलं. न्यूझीलंडतर्फे टिम साऊदीने दोन, ग्रॅण्डहोम आणि ईश सोढीने प्रत्येकी एक विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Eng vs Pak 1st Test : कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video
कसोटी मालिकेच्या पहिल्याच बॉलवर संपूर्ण पाकिस्तानी ड्रेसिंग रुमला शॉक, इंग्लंडविरुद्ध सलामीवीर गोल्डन डकवर चारही मुंड्या चीत, पाहा Video

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget