ICC Player of the Month : अलीकडे जागतिक क्रिकेटमध्ये दर महिन्याला एक नवा पुरस्कार देण्याची सुरुवात झाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात आयसीसीकडून (ICC) दर महिन्याला 'प्लेयर ऑफ मंथ'चा पुरस्कार दिला जातो. महिन्याभरात दमदार कामगिरी करण्याऱ्या क्रिकेटरला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान जून 2022 चा आयसीसी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टो याला मिळाला आहे. जॉनीसह या यादीत जो रुट आणि न्यूझीलंडचा डॅरी मिचेल हे दोघेही होते. या दोघांना मात देत जॉनीने पुरस्कार मिळवला आहे. जॉनीने न्यूझीलंड आणि भारताविरुद्धच्या सामन्यात उल्लेखणीय कामगिरी केली आहे.



जॉनीची भारतासह न्यूझीलंडविरुद्ध दमदार कामगिरी


यंदाच्या महिन्यात इंग्लंडच्या जॉनीने न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यात 78.80 च्या सरासरीने 394 धावा ठोकल्या. विशेष म्हणजे त्याने 77 चेंडूत शतक ठोकत इंग्लंडसाठी एक रेकॉर्डही केला. त्याच्या 92 चेंडूतील 136 धावांमुळे संघाला मोठा फायदा झाला. त्याने 150 धावाही 144 चेंडूत करत एक दमदार खेळी केली. सर्वच सामन्यात त्याने अफलातून कामगिरी केली. न्यूझीलंडनंतर इंग्लंडचा भारताविरुद्ध झालेल्या सामन्यातही जॉनीने कमाल कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कार मिळावला. ज्याने एका सामन्यातील दोन्ही डावात दोन शतकं ठोकत 220 रन केले. ज्यामुळे त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. 


आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवार्ड


आसीसीनं क्रिकेटमध्ये उत्साह वाढवण्यासाठी हा पुरस्काराची सुरुवात केली होती. प्रत्येक महिन्याला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान, पुरूष आणि महिला संघातील जे खेळाडू महिन्याभरात चांगली कामगिरी करून दाखवतात. त्यांची निवड करून त्यापैकी एकाला हा पुरस्कार दिला जातो. पुरुषांमध्ये वरील खेळाडूंना तर महिला क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या शबनिम इस्माईल, मरिझाने काप आणि इंग्लंडच्या नॅट स्किवर हीला नामांकित करण्यात आलं.


हे देखील वाचा-