IND W vs AUS W Preview : भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ (India vs Australia) यांच्यात आज कॉमनवेल्थ गेम्समधील (CWG) फायनलचा सामना पार पडणार आहे. भारताने इंग्लंडला तर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला मात देत फायनल गाठली आहे. आज दोन्ही बलाढ्य संघ सुवर्णपदकासाठी एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. पदकांच्या संख्येचा विचार करता अव्वलस्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियाला आणखी एक पदक मिळवण्याची संधी असून भारतालाही पदकसंख्या वाढवण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे पराभूत संघाला रौप्यपदक मिळणार असल्याने दोन्ही संघाचं पदक निश्चित झालं आहे. तर सामन्याविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ...


कधी, कुठे पाहाल सामना?


आजचा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना  भारतीय वेळेनुसार सायंकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सामना सुरु होईल. 9 वाजता नाणेफेक होईल. सामना सोनी स्पोर्ट नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामने पाहता येणार असून सोनी लिव्ह या अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com//amp येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.   


कशी असेल मैदानाची स्थिती?


आजच्या सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज नसल्यामुळे आणि खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांना मदत करेल, दोन्ही संघ आक्रमक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे दोन्ही संघ नाणेफेक जिंकून एजबॅस्टनवर बचावासाठी जबरदस्त धावसंख्या ठेवण्याचा प्रयत्न करतील.


पदक निश्चित


कॉमनवेल्थमध्ये प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश झाला असताना भारतीय महिलांनी पदकही निश्चित केलं आहे. त्यांनी यासाठी सुरुवातीपासून दमदार कामगिरी केली. ज्यानंतर सेमीफायनलमध्ये इंग्लंडवर रोमहर्षक विजय मिळवत पदक निश्चित केलं आहे. सेमीफायनलच्या सामन्यात आधी फलंदाजी करत भारताने इंग्लंडसमोर 165 धावांचं आव्हान ठेवलं, जे पार करताना इंग्लंडचा संघ 20 षटकात 160 धावाच करु शकला आणि भारत 4 धावांनी विजयी झाला. 


हे देखील वाचा-