Australia vs India 5th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीची पाचवी आणि शेवटची कसोटी सिडनीमध्ये खेळली जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले. खराब फॉर्मशी झगडत असलेल्या रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे. तर याशिवाय आकाशदीपच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली. या सामन्यात रोहित शर्मा बाहेर गेला, पण टीम इंडियाची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा फेल ठरली. उपाहारापूर्वी, म्हणजे पहिल्याच सत्रात संघाची आघाडीची फळी पॅव्हेलियनमध्ये परतली होती. त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून टीकेचा वर्षाव होत आहे.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलने पुन्हा एकदा सलामीची जबाबदारी घेतली. तरीही राहुल काही विशेष करू शकला नाही. संघाने पाचव्या षटकात राहुलच्या रूपाने पहिली विकेट गमावली, तो केवळ 04 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर संघाला दुसरा झटका यशस्वी जैस्वालच्या रूपाने आठव्या षटकात बसला. जैस्वालने 1 चौकाराच्या मदतीने 10 धावा केल्या. यानंतर काही काळ कोहली आणि शुभमन गिलने डावाची धुरा सांभाळत तिसऱ्या विकेटसाठी 40 धावांची भागीदारी केली.
ही भागीदारी लंचपूर्वी एका चेंडूवर संपुष्टात आली. उपाहारापूर्वी शुभमन गिल 2 चौकारांच्या मदतीने 20 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. अशाप्रकारे पहिल्याच सत्रात टीम इंडियाची टॉप ऑर्डर 57 धावांवर कोसळली. जैस्वालला स्कॉट बोलंडने, केएल राहुलला मिचेल स्टार्कने आणि शुभमन गिलला नॅथन लियॉनने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
कोहली पुन्हा अडकला 'त्या' जाळ्यात
दुसऱ्या सत्रात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूशी छेडछाड करताना आऊट झाला. सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात 17 धावा करून कोहली स्कॉट बोलंडचा शिकार बनला.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): सॅम कॉन्स्टॅन्स, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (डब्ल्यू), पॅट कमिन्स (क), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.
हे ही वाचा -