Australia vs India 5th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा टी-20 सामना सिडनीत (Sydney Test) खेळवला जात आहे. या सामन्यातील सर्वात मोठी बातमी म्हणजे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. रोहितच्या जागी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सिडनी कसोटी संघाचे नेतृत्व करत आहे आणि हिटमॅनची जागा शुभमन गिलने घेतली आहे. आता प्रश्न असा आहे की, सिडनी कसोटीतून रोहित शर्मा का बाहेर गेला? नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहने याचे कारण सांगितले आहे. नाणेफेक दरम्यान रवी शास्त्री यांनी बुमराहकडून रोहितबद्दल काही विचारलेही नाही पण भारतीय कर्णधारानेच सर्व काही सांगितले.
रोहित शर्माला वगळण्यात आले की स्वतः विश्रांती घेतली?
नाणेफेक जिंकल्यानंतर जसप्रीत बुमराह म्हणाला की, रोहित शर्माने स्वतः सिडनी कसोटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितच्या या निर्णयामुळे टीम इंडियामध्ये किती एकता आहे हे पाहू शकता. यात कोणता स्वार्थ नाही. संघाच्या हिताचे जे काही असेल, आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करू. खरंतर, बुमराहचे हे वक्तव्य थोडे विचित्र वाटले कारण मीडिया रिपोर्ट्सनुसार टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये सर्व काही ठीक नाही. आणि रोहित आणि गौतम गंभीर यांच्यात मतभेद आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गौतम गंभीरला फोन करून रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवावे, असे सांगितले होते, पण मुख्य प्रशिक्षक सहमत नव्हते. खरे काय ते आता फक्त टीम इंडियाच्या खेळाडूंनाच माहीत आहे. पण, रोहित शर्माला वगळण्याचं खरं कारण म्हणजे त्याची कामगिरी आहे. या कसोटी मालिकेत रोहितला 5 डावात केवळ 32 धावा करता आल्या. याआधी तो न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही फ्लॉप ठरला होता.
ऑस्ट्रेलिया संघ (प्लेइंग इलेव्हन) : सॅम कॉन्स्टॅन्स, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, ॲलेक्स कॅरी (डब्ल्यू), पॅट कमिन्स (क), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.
भारतीय संघ (प्लेइंग इलेव्हन) : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (कर्णधार), प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज.
हे ही वाचा -