India vs Australia 5th Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनी येथे बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा (BGT) शेवटचा आणि पाचवा कसोटी सामना खेळला जात आहे. रोहित शर्मा सिडनी कसोटीत (Sydney Test) खेळत नाहीये. रोहितच्या जागी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघाचे नेतृत्व करत आहे. जसप्रीत बुमराहने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला आणि आकाश दीपच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संधी देण्यात आली.


टीम इंडियाची खराब सुरुवात


शेवटच्या कसोटी सामन्यात भारताची सुरुवात खुपच खराब झाली. ऑस्ट्रेलियाने सुरुवातीलाच भारताच्या दोन्ही सलामीवीरांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. प्रथम केएल राहुल बाद झाला आणि नंतर यशस्वी जैस्वाल. केएल राहुल पाचव्या षटकात फक्त 4 धावा काढून मिचेल स्टार्कचा शिकार झाला. त्यानंतर स्कॉट बोलंडच्या सातव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर यशस्वी जैस्वालची विकेट पडली. यानंतर विराट कोहली आला आणि तो येताच ड्रामा पाहायला मिळाला.  


विराट कोहली मैदानात येताच पाहायला मिळाला ड्रामा...


खरंतर, आठव्या षटकातील चौथ्या चेंडूवर यशस्वीला बोलंडने आऊट केले. त्यानंतर कोहली आला. कोहली येताच टाळ्यांचा कडकडाट झाला. मात्र, बाहेर जाणाऱ्या पहिल्या चेंडूवर कोहलीला बोलंडने आऊट केले. चेंडू त्याच्या बॅटच्या कट घेऊन दुसऱ्या स्लिपमध्ये स्टीव्ह स्मिथकडे गेला.


चेंडू वेगाने आपल्या दिशेने येत असल्याचे पाहून स्मिथने खाली पडून उजव्या हाताने चेंडू पकडला. त्यानंतर सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडू सेलिब्रिटी करायला लागले. मात्र, फील्ड अंपायर थेट थर्ड अंपायरकडे वळले. यानंतर मैदानाला चेंडूचा स्पर्श झाल्याचे रिप्लेमध्ये स्पष्ट झाले. थर्ड अंपायरच्या या निर्णयाने स्मिथ अजिबात खूश दिसत नसला. या निर्णयावर ऑस्ट्रेलियन चाहते आणि संघ खूश नव्हते.






अंपायरिंगवर प्रश्न


या मालिकेतही अनेकवेळा अंपायरिंगवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात केएल राहुलला थर्ड अंपायरने ज्या पद्धतीने आऊट दिला होता, त्यावरून बराच वाद झाला होता. तर मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात यशस्वीला तिसऱ्या अंपायरने आऊट दिल्याने त्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, यावेळी तिसऱ्या पंचाने सर्व बाजू बघून निर्णय घेतल्याने कोहली आऊट झाला नाही.