Women’s T20 Asia Cup 2022, India Sqaud : महिला आशिया कप 2022 (Women’s T20 Asia Cup) स्पर्धा यंदा बांग्लादेशमध्ये पार पडणार असून भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया, युएई आणि थायलंड हे सात संघ आशिया चषकासाठी एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरतील. या भव्य स्पर्धेसाठी भारतीय महिलांचा संघ नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यावेळी हरमनप्रीत कौरकडे संघाचं नेतृत्त्व देण्यात आलं असून स्मृती मानधना उपकर्णधार असणार आहे. तर नेमका संघ कसा आहे पाहूया...

महिला आशिया कपसाठी भारतीय संघ -

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, एस. मेघना, रिचा घोष (विकेटकिपर), स्नेह राणा, डी हेमलता, मेघना सिंह, रेणुका ठाकूर, पुजा वस्त्राकर, राधा गायकवाड, राधा यादव , के.पी.नवगिरे 

राखीव खेळाडू - तानिया भाटीया, सिमरन दिल बहादुर 

बांग्लादेशमध्ये पार पडणार स्पर्धा

महिला आशिया कप ही स्पर्धा 1 ऑक्टोबरपासून ते 15 ऑक्टोबरपर्यंत पार पडणार असून भारत आपला सलामीचा सामना श्रीलंका संघासोबत 1 ऑक्टोबर रोजी खेळणार आहे. 7 ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोघेही आमने सामने येणार असून राऊंड रॉबीन पद्धतीने ही टूर्नामेंट पार पडणार आहे. या मालिकेती सामने हे बांग्लादेशच्या एसआयसीएस ग्राऊंड 1 आणि एसआयसीएस ग्राऊंड 2 याठिकाणी पार पडणार आहेत. भारतीय संघाचं नेतृत्त्व हरमनप्रीत कौर करणार असून संपूर्ण वेळापत्रक पुढीलप्रमाणे...

असं आहे महिला आशिया कप 2022 वेळापत्रक - 

दिनांक सामना ठिकाण वेळ
1 ऑक्टोबर बांग्लादेश विरुद्ध थायलंड एसआयसीएस ग्राऊंड 2 9 AM
1 ऑक्टोबर भारत विरुद्ध श्रीलंका एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
2 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 2 9 AM
2 ऑक्टोबर श्रीलंका विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
3 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश  एसआयसीएस ग्राऊंड 2 9 AM
3 ऑक्टोबर भारत विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
4 ऑक्टोबर श्रीलंका विरुद्ध थायलंड एसआयसीएस ग्राऊंड 2 9 AM
4 ऑक्टोबर भारत विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
5 ऑक्टोबर युएई विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 2 1.30 PM
6 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध थायलंड सीआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
6 ऑक्टोबर बांग्लादेश विरुद्ध मलेशिया सीआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
7 ऑक्टोबर थायलंड विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
7 ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
8 ऑक्टोबर श्रीलंका विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
8 ऑक्टोबर भारत विरुद्ध बांग्लादेश एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
9 ऑक्टोबर थायलंड विरुद्ध मलेशिया एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
9 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
10 ऑक्टोबर श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश  एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
10 ऑक्टोबर भारत विरुद्ध थायलंड एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
11 ऑक्टोबर बांग्लादेश विरुद्ध युएई एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
11 ऑक्टोबर पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
13 ऑक्टोबर सेमीफायनल 1 एसआयसीएस ग्राऊंड 1 9 AM
13 ऑक्टोबर सेमीफायनल 2  एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM
15 ऑक्टोबर फायनल  एसआयसीएस ग्राऊंड 1 1.30 PM

हे देखील वाचा-