IPL 2020 : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात मैदानात प्रेक्षकांचा आवाज घुमणार आहे. कारण आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांना मैदाना उपस्थित राहण्याची परवानगी मिळाली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आयोजकांनी याबाबत माहिती दिली. संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये 19 सप्टेंबरपासून आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. 


क्रिकेट फॅन्स उद्यापासून म्हणजे 16 सप्टेंबरपासून सामन्यांचे तिकीट ऑनलाईन बूक करू शकतील. IPL च्या अधिकृत वेबसाईट www.iplt20.com वरून प्रेक्षकांना तिकिटे खरेदी करता येतील. आयपीएलचे उर्वरित 31 सामने 19 सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहेत. हे सामने दुबई, शारजाह आणि अबू धाबी येथे मर्यादित प्रेक्षकांसह खेळवले जातील. मात्र किती प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळेल याबद्दल काहीही सांगितले गेले नाही. या दरम्यान, कोविड प्रोटोकॉल आणि यूएई सरकारच्या कोरोना संबंधित नियमांचे पालन केले जाईल. 


मुंबई-चेन्नई यांच्यात रंगणार पहिला सामना


पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) मधील हा सामना दुबई येथे खेळवण्यात येणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होईल. पूर्वीप्रमाणे आयपीएल सामने हे दुपारी 3.30 आणि सायंकाळी 7.30 वाजता खेळवण्यात येणार आहे. 


आईपीएल 2021 च्या दुसऱ्या पर्वाचे वेळापत्रक



  • 19 सप्टेंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. मुंबई इंडियन्स ( सायं. 7.30)

  • 20 सप्टेंबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू ( सायं. 7.30)

  • 21 सप्टेंबर -  पंजाब वि.राजस्थान रॉयल्स ( सायं. 7.30)

  • 22 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)

  • 23 सप्टेंबर - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट रायडर्स ( सायं. 7.30)

  • 24 सप्टेंबर-  रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30)

  • 25 सप्टेंबर - दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स (दुपारी 3.30)

  • सनरायजर्स हैदराबाद वि. पंजाब किंग्ज ( सायं. 7.30)

  • 26 सप्टेंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. कोलकाता नाईट रायडर्स  (दुपारी 3.30)

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. मुंबई इंडियन्स  ( सायं. 7.30)

  • 27 सप्टेंबर - सनरायजर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स  ( सायं. 7.30)

  • 28 सप्टेंबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स  (दुपारी 3.30)

  • मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्ज  ( सायं. 7.30 )

  • 29 सप्टेंबर - राजस्थान रॉयल्स वि. रॉयल्स चॅलेंजर्स बंगळूरू ( सायं. 7.30 )

  • 30 सप्टेंबर - सनरायजर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्ज ( सायं. 7.30 )

  • 1 ऑक्टोबर - कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्ज पंजाब   ( सायं. 7.30 )

  • 2 ऑक्टोबर - मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स  (दुपारी 3.30)

  • राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज    ( सायं. 7.30)

  • 3 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स वि. पंजाब किंग्ज   (दुपारी 3.30)

  • कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)

  • 4 ऑक्टोबर - दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्ज  ( सायं. 7.30)

  • 5 ऑक्टोबर - राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स   ( सायं. 7.30)

  • 6 ऑक्टोबर - रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु वि, सनरायजर्स हैदराबाद ( सायं. 7.30)

  • 7 ऑक्टोंबर - चेन्नई सुपर किंग्ज वि. पंजाब किंग्ज  (दुपारी 3.30)

  • कोलकाता नाईट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स  ( सायं. 7.30)

  • 8 ऑक्टोबर - सनराजर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स  (दुपारी 3.30)

  • रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू वि. दिल्ली कॅपिटल्स  (दुपारी 3.30)

  • 10 ऑक्टोबर - क्वालीफायर 1

  • 11 ऑक्टोबर - एलीमिनेटर

  • 13 ऑक्टोबर - क्वालीफायर 2

  • 15 ऑक्टोबर फायनल