Mukesh Kumar's Marriage : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मुकेश कुमार लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. बीसीसीआयकडून त्याला सुट्टी देण्यात आली आहे. मुकेश कुमार ऑस्ट्रेलियाविरोधात सुरु असलेल्या पाच सामन्याच्या टी 20 मालिकेत टीम इंडियाचा सदस्य होता. लग्नासाठी मुकेश कुमारने बीसीसीआयकडे सुट्टीची विनंती केली होती. बीसीसीआयने त्याला रिलिज केलेय. त्याशिवाय दीपक चाहर याला संघात सामील केलेय. मुकेश कुमार चौथ्या टी 20 सामन्यासाठी उपलब्ध असेल, असेही बीसीसीआयकडून सांगण्यात आलेय. 


गुवाहाटी येथे सुरु असलेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात मुकेश कुमारच्या जागी आवेश खान याला प्लेईंग 11 मध्ये स्थान देण्यात आलेय. त्याआधीच्या दोन्ही सामन्यात मुकेश कुमार प्लेईंग 11 चा भाग होता. बीसीसीआयकडून मुकेश कुमारबाबदची माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये बीसीसीआयने म्हटलेय की, वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याने तिसऱ्या टी 20 सामन्याआधी स्क्वाडमधून रिलिज करण्याची विनंती केली होती. मुकेश कुमार लग्न करत आहे, त्यासाठी त्याला सुट्टी देण्यात आली आहे. रायपूर येथे होणाऱ्या चौथ्या टी 20 सामन्यासाठी मुकेश कुमार टीम इंडियासोबत जोडला जाईल. दीपक चाहर याला मालिकेतील इतर सामन्यासाठी दीपक चाहर याला संघासोबत सामील करण्यात आलेय.






मुकेश कुमारची पत्नी कोण?


नवभारत टाइम्सच्या वृत्तानुसार,  मुकेश कुमार गोरखपूरमध्ये लग्न करत आहे. त्याची होणारी पत्नी छपरा येथील  बनियापुर बेरुई गावातील राहणारी आहे. त्यांचे नाव दिव्या सिंह असे आहे. 


भारतासाठी तिन्ही फॉर्मेटसाठी पदार्पण  
मुकेश कुमार याने कसोटी, वनडे आणि टी 20 मध्ये पदार्पण केलेय. जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरोधात त्याने कसोटी आणि वनडे मध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर टी 20 मध्येही त्याने पदार्पण केले. मुकेश कुमारने आतापर्यंत एक कसोटी, तीन वनडे आणि सात टी 20 सामने खेलळे आहे.  कसोटीत मुकेश कुमारने दोन विकेट घेतल्या आहेत. तर वनडे आणि टी 20 मध्ये प्रत्येकी चार चार विकेट नावावर आहेत.   


आणखी वाचा :


मोठी बातमी..  टी20 विश्वचषकासाठी नामिबिया पात्र, आता एका जागेसाठी तीन संघात स्पर्धा