IND vs AUS 3rd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पाच सामन्याच्या मालिकेतील तिसरा टी20 सामना आज गुवाहाटी येथे होणार आहे.  बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ भिडणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ मालिका वाचवण्यासाठी मैदानात उतरले, तर भारतीय संघ विजयासाठी मैदानात उतरले. भारतीय संघाने पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे, तिसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याच्या इराद्याने टीम इंडिया उतरले. सूर्य कुमार यादवच्या नेतृत्वातील युवा टीम इंडिया भन्नाट फॉर्मात आहे. पाहूयात दोन्ही संघाची प्लेईंग 11 अन् पिच रिपोर्ट


बारसापारा क्रिकेट स्टेडियमचा रेकॉर्ड


बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये आतापर्यंत फक्त तीन टी 20 सामने झालेत. भारताला यामधील फक्त एका सामन्यात विजय मिळवता आलाय. ऑस्ट्रेलियाचाही येथे फक्त एक सामना झालाय, त्या सामन्यात त्यांनी विजय मिळवलाय. 


मॅच प्रिडिक्शन 


सूर्याच्या नेतृत्वातील टीम इंडियाने मालिकेच्या सुरुवातीपासूनच आपला दबदबा कायम ठेवला आहे. दुसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 235 धावा फलकावर लावल्या आणि एकतर्फी विजयाची नोंद केली. अशा परिस्थितीत टीम इंडिया तिसरा सामना जिंकून मालिकेवर आपले नाव कोरेल, असे प्रेडिक्शन मीटर सांगतोय. 


पिच रिपोर्ट 


गुवाहाटीच्या बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत फक्त तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत.  येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल मानली जाते. खेळपट्टी वेगवान आणि उसळीला मदत करणारी आहे. त्यामुळे या मैदानावर फलंदाजी करणे अधिक सोपं होते. टी 20 क्रिकेटमधील येथील सर्वोच्च धावसंख्या  237 धावा आहे, जी भारताने 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती.


सपाट खेळपट्टी आणि वेगवान आऊटफील्डमुळे मोठी धावसंख्या उभारण्यास मदत होते. या मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडतो. येथे वेगवान गोलंदाजांना सीम आणि स्विंगमध्ये फारशी मदत मिळत नाही, तर फिरकीपटूंना टर्न मिळतो.


गुवाहाटीमध्ये पाऊस विलन ठरणार का?


AccuWeather च्या अंदाजानुसार, मंगळवारी गुवाहाटीमध्ये पाहवासाची शक्यता नाहीच. आभाळ साफ राहणार आहे. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास 21 डिग्री तापमान राहण्याची शक्यता आहे.


तिसऱ्या टी 20 सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेईंग 11 


सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जायसवाल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा. 


ऑस्ट्रेलियाची संभाव्य प्लेईंग 11


स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट/ट्रेविस हेड, जोश इंग्लिस, मार्कस स्टोयनिस, टिम डेविड, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड (कर्णधार आणि विकेटकीपर), सीन एबॉट, नाथन एलिस, एडम जम्पा, तनवीर सांघा.