MS Dhoni: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीविरोधात (MS Dhoni) आयपीएस अधिकारी जी. संपत कुमार (G Sampath Kumar) यांनी दाखल केलेली याचिका मद्रास उच्च न्यायालयानं (Madras HC) फेटाळलीय. धोनीवर 2014 च्या आयपीएल (IPL) सामन्यांमध्ये सट्टेबाजी, स्पॉट फिक्सिंग आणि मॅच फिक्सिंगमध्ये सामिल असल्याचे आरोप झाले होते. या संदर्भात धोनीनं माध्यमांवर आणि अन्य काही व्यक्तींवर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकला होता. यात जी. संपत कुमार यांचाही समावेश होता. त्यावेळी जी. संपत यांनी आपल्यावरील मानहानीचा दावा मागे घेण्यात यावा, यासाठी धोनीविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ही याचिका फेटाळत न्यायालयानं धोनीला मोठा दिलासा दिलाय. 


धोनीने दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेत म्हटले आहे की, एका टीव्ही मीडिया कंपनीसह काही लोकांनी धोनी मॅच आणि स्पॉट-फिक्सिंग आणि आयपीएल सामन्यांमध्ये सट्टेबाजीमध्ये सामील असल्याचं सांगत बदनामीकारक बातम्या चालवल्या. यासंदर्भात कोणतेही वक्तव्य प्रसिद्ध करण्यापासून रोकावं, अशी मागणी धोनीनं केली होती. तसेच या याचिकेतील प्रतिवादींनी क्रिकेट चाहत्यांसमोर त्याची प्रतिमा मलिन करण्याचा उद्येश आहे, असंही धोनीचं म्हणणं होतं. दरम्यान, संपत कुमार यांनी धोनीनं ठोकलेल्या मानहानीच्या दाव्याविरोधात 2014 मध्ये मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका मद्रास उच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय. 


2013 च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात तीन क्रिकेटपटूंना अटक करण्यात आली होती. यामध्ये श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अंकित चंडिला यांचा समावेश होता. यासोबतच चेन्नई सुपर किंग्जचे मालक एन श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन याचेही नाव बेटिंगमध्ये आले होते. त्यानंतर त्याला मैदानावर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नई आणि राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha