भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी (Vinod Kambli) यांची आर्थिक परिस्थिती खालवल्या संदर्भातल्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये पाहिल्यानंतर अहमदनगरच्या (Ahmednagar) सह्याद्री मल्टीस्टेटचे (Sahyadri Multistate) चेअरमन संदीप थोरात यांनी विनोद कांबळी यांना एक लाख रुपये प्रति महिना पगाराची नोकरी ऑफर करण्याचं ठरवलंय. लवकरच आपण विनोद कांबळे यांची भेट घेणार असल्याचं संदीप थोरात यांनी एबीपी माझा शी बोलताना सांगितलंय. देशासाठी खेळलेल्या महान खेळाडूची अशी परिस्थिती असल्यानंतर नक्कीच ती विचार करायला लावणारे आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन आम्ही त्यांना ही नोकरी ऑफर करणार असल्याचा थोरात यांनी म्हटलं.


सह्याद्री मल्टीस्टेटचे मुंबई येथे फायनान्स कंपनीची शाखा लवकरच सुरू होणार आहे. त्या शाखेच्या व्यवस्थापक पदासाठी आपण त्यांना ही नोकरी देणार असल्याचं थोरात यांनी म्हटलं. मात्र, ही नोकरी स्वीकारायची किंवा नाही? याबाबत कांबळी यांनी निर्णय घ्यायचा आहे असंही त्यांनी म्हटलंय.


विनोद कांबळीचं आर्थिक परिस्थितीवर भाष्य
मिड डे वृत्तपत्रला दिलेल्या मुलाखतीत विनोद कांबळी म्हणाला होता की, "मी एक निवृत्त झालेला क्रिकेटपटू आहे आणि पूर्णपणे बीसीसीआयच्या पेन्शनवर अवलंबून आहे. माझ्या उत्पन्नाचा एकमेव स्रोत बीसीसीआय आहे आणि त्यासाठी मी त्यांचा खूप आभारी आहे. याच पैशातून माझ्या कुटुंबाचा खर्च भागतो. मला नोकरीची गरज आहे. मुंबईनं अमोल मजुमदार यांना मुख्य प्रशिक्षक म्हणून ठेवलंय. परंतु त्यांना माझी गरज असल्यास मी उपलब्ध आहे. मी मुंबईसाठी खेळलो आहे आणि म्हणूनच त्यानं माझ्यासाठी काहीतरी करावं असं मला वाटतं."


सचिन तेंडुलकरबाबत काय म्हणाला?
"मी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडं गेलो होतो. मला माझं घर चालवायचं आहे. मी अनेकदा एमसीएला माझी गरज भासल्यास मी येईल, असं म्हणालोय. सचिन तेंडुलकरला माझ्या परिस्थितीची कल्पना आहे. त्यानं याआधीही माझी मदत केलीय. त्यानं माझ्याकडं तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकॅडमीची जबाबदारी सोपवली होती. तो माझा खूप चांगला मित्र आहे. मी आता त्याच्याकडून मदतीची आशा ठेवत नाही."


विनोद कांबळीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विनोद कांबळीनं आपल्या कारकिर्दीत भारतासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या 1 हजार 84 धावा आणि कसोटीत 2477 धावा आहेत. लहानपणी तो सचिनसोबत क्रिकेट खेळायचा. त्यानं आपल्या कारकिर्दीची सुरुवातही दमदार पद्धतीनं केली. पण नंतर तो आपला फॉर्म कायम राखू शकला नाही आणि संघाबाहेर बाहेर पडावं लागलं.


हे देखील वाचा-