IND vs SL, 2nd ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा एकदिवसीय सामना उद्या अर्थात रविवारी तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे. या मालिकेत टीम इंडियाने श्रीलंकेवर 2-0 अशी विजयी आघाडी घेतली असून व्हाईट वॉश देण्याच्या प्रयत्नात टीम इंडिया आहे. दरम्यान तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघातील अनेक खेळाडू देवाचे दर्शन घेण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी श्री पद्मनाभस्वामी मंदिरात पोहोचल्याचं पाहायला मिळालं. भारतीय खेळाडू पद्मनाभस्वामी मंदिरात पोहोचल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


भारतीय संघ पद्मनाभस्वामी मंदिरात  


टीम इंडियाला रविवारी श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेतील (India vs Sri Lanka ODI Series) शेवटचा सामना खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचे स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल हे पद्मनाभस्वामी मंदिरात पोहोचले. या खेळाडूंनी येथे पोहोचून देवाचे आशीर्वाद घेतले. विशेष म्हणजे पूजेदरम्यान सर्व भारतीय खेळाडू पारंपारिक कपड्यांमध्ये दिसले पाहिजेत. या ड्रेसमधील भारतीय खेळाडूंचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


पाहा फोटो-






टीम इंडिया मालिकेत 2-0 ने पुढे


श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघ 2-0 ने आघाडीवर आहे. कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 4 गडी राखून पराभव करत एकदिवसीय मालिका जिंकली होती. त्याचबरोबर या मालिकेतील पहिला सामनाही भारताच्या नावावर झाला. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला होता. टीम इंडिया सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. अशा स्थितीत टीम इंडिया क्लीन स्वीप करत ही मालिका 3-0 ने आपल्या नावावर करेल, अशी आशा सर्वांना आहे.


तिसऱ्या वनडेसाठी दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन


भारत - शुभमन गिल, हार्दिक पंड्या, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, एस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप शर्मा, उमरान मलिक, एम शमी, मोहम्मद सिराज.


श्रीलंका - पाथुम निसांका, नुवानिडू फर्नांडो, सी अस्लांका, दासुन शानाका (क), डीडी सिल्वा, डब्ल्यू हसरंगा, सी करुणारत्ने, दुनिथ वेलालेज, के मेंडिस (विकेटकीपर), लाहिरू कुमारा, के रजिथा.


हे देखील वाचा-