Siddharth Sharma Dies : भारतीय क्रिकेट जगतातून (Indian Cricket) एक दु:खद बातमी समोर येत आहे. हिमाचल प्रदेशचा (Himchan Pradesh) युवा वेगवान गोलंदाज सिद्धार्थ शर्मा (Siddharth Sharma) याचा वडोदरा येथील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तो अवघ्या 28 वर्षांचा होता. सिद्धार्थची क्रिकेट कारकीर्द फार काळ टिकली नाही, मात्र त्याने आपल्या छोट्याशा कारकिर्दीत सर्वांनाच प्रभावित केलं होतं. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 28 विकेट घेतल्या आहेत. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू (Sukhvinder Singh Sukhu) यांनी सिद्धार्थच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. आपल्या अधिकृत ट्वीटरवरुन त्यांनी ट्वीट करत निधनाची माहिती दिली आहे.


सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीने हिमाचलसह संपूर्ण देशाच्या क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. कारण अवघ्या वर्षाच्या वयात एक प्रतिभावान क्रिकेटर भारताने गमावला आहे. याबाबत हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सचिव अवनीश परमनर यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, ''हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनमधील (Himchal Pradesh Cricket Association) प्रत्येकाला खूप दुःख झाले आहे. सिद्धार्थ गुरुवारी आम्हाला सोडून गेला. गेल्या काही दिवसांपासून तो व्हेंटिलेटरवर होता. बडोद्याविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सिद्धार्थ आमच्या संघाचा भाग होता.''


मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी केलं ट्वीट


हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सिद्धार्थच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवर लिहिले की, "हिमाचलचा विजय हजारे ट्रॉफी विजेता संघासाठी आणि संपूर्ण राज्यासाठी स्टार वेगवान गोलंदाज सिद्धार्थ शर्मा याच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. त्याच्या दिवंगत आत्म्यास शांती आणि प्रियजनांना हे मोठे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना."






हे देखील वाचा-