मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसोबतचा वार्षिक करार जारी केला आहे. या करारानुसार बीसीसीआय खेळाडूंना मानधन देते. बीसीसीआयने कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला ग्रेड ए प्लस कॅटेगरीत स्थान दिलं आहे. विराट, रोहित, बुमराहला वर्षाकाठी सात कोटी रुपये मिळतील.
बीसीसीआयने तीन खेळाडूंना ग्रेड ए + कॅटेगरीत स्थान दिले तर 10 खेळाडूंना ग्रेड ए कॅटेगरीत स्थान दिले आहे. त्यात हार्दिक पांड्या, आर अश्विन, रवींद्र जाडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि ऋषभ पंत यांचा समावेश आहे. या सर्वांना वर्षाकाठी पाच कोटी रुपये मिळतील.
बीसीसीआयच्या नव्या करारामध्ये सलामीवीर शुभमन गिल आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांना पहिल्यांदा केंद्रीय करारात सामील करण्यात आलं आहे. ग्रेड सीमध्ये दोघांना स्थान मिळालं असून दोघांना वार्षिक एक कोटी रुपये मिळतील.
बीसीसीआय वार्षिक करार यादी
- ग्रेड ए प्लस (सात कोटी रुपये): विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह.
- ग्रेड ए (पाच कोटी): आर अश्विन, रवींद्र जाडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या.
- ग्रेड बी (तीन कोटी): वृद्धिमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर आणि मयंक अग्रवाल.
- ग्रेड सी (एक कोटी): कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल आणि मोहम्मद सिराज.