DC vs RR IPL 2021 Match Preview: आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना रंगणार आहे. दोन युवा यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज असलेल्या कर्णधारांमध्ये वानखेडेवर ही रंगतदार लढत असणार आहे. विशेष म्हणजे दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत आणि राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन या दोघांकडेही आयपीएलमध्ये पहिल्यांदाच नेतृत्व आलं आहे. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी दोघांचा प्रयत्न असणार आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळला जाणार आहे.
दिल्लीने पहिल्या सामन्यात धमाकेदार कामगिरी करत अनुभवी महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईला हरवलं आहे. तर दुसरीकडे पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा मात्र पंजाब विरुद्ध निसटता पराभव झाला. मात्र या सामन्यात संजू सॅमसनच्या आक्रमक शतकी खेळीमुळं राजस्थानचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला आहे.
IPL 2021 : बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीच्या अडचणींमध्ये वाढ; कारवाई होणार?
राजस्थान रॉयल्सला जोफ्रा आर्चर दुखापतग्रस्त असल्याने पहिल्या सामन्यात फटका बसला होता. त्यानंतर आता ऑलराऊंडर बेन स्टोक्स देखील दुखापतीमुळं आयपीएलमधून बाहेर गेला आहे. त्यामुळे डेविड मिलर किंवा लियम लिविंगस्टोनला संधी मिळण्याची शक्यता आहे. राजस्थानकडून संजू सॅमसनसह, मनन वोहरा, जोस बटलर, लियम लिविंगस्टोन, शिवम दुबेकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा आहे.
दुसरीकडे दिल्लीने ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली पहिला सामना जिंकला आहे. त्यामुळे दिल्ली संघात बदल होण्याची शक्यता कमीच आहे. दिल्लीकडून सलामीवीक शिखर धवन आणि पृथ्वी शॉ जबरदस्त फार्मात आहेत. सोबतच ऋषभ पंत, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमेयर यांच्या खेळीकडे देखील लक्ष असणार आहे.
असे असतील संभाव्य संघ
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कर्णधार), मनन वोहरा, जोस बटलर, लियम लिविंगस्टोन, शिवम दुबे, रियान पराग, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, श्रेयस गोपाल, चेतन सकारिया, मुस्ताफिजुर रहमान
दिल्ली कॅपिटल्स: ऋषभ पंत (कर्णधार), शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, मार्कस स्टॉयनिस, शिमरॉन हेटमेयर, ख्रिस वॉक्स, आर. अश्विन, आवेश खान, टॉम करन, अमित मिश्रा