Shane Warne : अवघ्या क्रिकेट विश्वाला ज्यांच्या फिरकी गोलंदाजीने अक्षरश: वेड लावलं होत त्या शेन वॉर्न (Shane Warne) यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. थायलंडला सुट्टीसाठी गेलेले वॉर्न 4 मार्च 2022 रोजी त्यांच्या हॉटेलच्या खोलीत मृतावस्थेत आढळले होते. हृदयविकारामुळे त्यांचे निधन झाले. आता या दिग्गज खेळाडूच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होत असताना, संपूर्ण क्रिकेट जगताला पुन्हा एकदा त्यांची आठवण आली आहे.


क्रिकेट चाहत्यांपासून ते दिग्गज क्रिकेटपटूंपर्यंत, शेन वॉर्नच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त खास पोस्ट शेअर केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने शेन वॉर्नसोबतचा जुना फोटो शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर अॅडम गिलख्रिस्टनेही वॉर्नचा फोटो शेअर करत एक हृदयस्पर्शी नोट लिहिली आहे. त्याने वॉर्नसोबतच रॉड मार्शचा फोटोही शेअर केला आहे. रॉड मार्शचाही 4 मार्च 2022 रोजी मृत्यू झाला. क्रिकेट जगत शेन वॉर्नला कशाप्रकारे मिस करत आहे पाहूया...






































शेन वॉर्न यांची कारकीर्द 


जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू तसंच एक दिग्गज कर्णधार अशी शेन वॉर्न यांची ख्याती होती. ऑस्ट्रेलियाकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला वॉर्न क्रिकेट जगतात बहुतेक सर्वांना माहित आहे. वॉर्न यांनी 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या आहेत. तर 194 एकदिवसीय सामन्यात 293 गड्यांना माघारी धाडलं आहे. याशिवाय 55 आयपीएल सामन्यात वॉर्नने 57 विकेट मिळवल्या आहेत. मुरलीधरननंतर वॉर्न हा दुसरा गोलंदाज आहे ज्याने 708 विकेट घेतल्या आहेत. 2007 साली वॉर्नने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वॉर्नने क्रिकेटमधील प्रत्येक फॉरमॅटमध्ये आपली छाप सोडली आहे.  


शेन वॉर्नची नेत्रदिपक कामगिरी


- कसोटी क्रिकेटमध्ये शेन वॉर्नच्या नावावर एकूण 708 विकेट्सची नोंद आहे. 




- मुथय्या मुरलीधरननंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 विकेट्सचा टप्पा गाठणार जगातील दुसरा गोलंदाज.



- एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 194 सामन्यात 293 विकेट्सची नोंद


- सर्वाधिक वेळा पाच विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत तब्बल 37 वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. 


- एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम, शेन वॉर्नने 2005 मध्ये 96 कसोटी विकेट्स घेतल्या होत्या.


- शेन वॉर्नने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 13 अर्धशतकं झळकावली आहेत.


हे देखील वाचा-