Indian Cricket Teams Reached Ahmedabad : उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत भारतीय संघाने फायनलचे तिकीट मिळवले. 19 नोव्हेंबर, रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनलचा सामना रंगणार आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना खेळण्यासाठी आज टीम इंडिया न्यूझीलंडमध्ये दाखल झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ विश्वचषकात आतापर्यंत अजेय आहे. आणखी एका विजयासाठी टीम इंडिया अहमदाबादमध्ये पोहचली आहे. भारतीय संघ अहमदाबादमध्ये दाखल होताच, चाहत्यांची गर्दी जमली आहे.
भारतीय संघ अहमबादामध्ये दाखल झाल्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी दिसत आहे. टीम इंडियाला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली आहे. तर दुसऱ्या बाजूने टीम बस येताना दिसत आहे. टीम बस पाहून चाहत्यांमध्ये एक वेगळाच जल्लोष पाहायला मिळाला. व्हिडीओमध्ये चाहत्यांमधील उत्साह पष्टपणे दिसत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या इराद्याने अहमदाबादला पोहोचली आहे. आतापर्यंत 2011 आणि 1983 मध्ये भारताने चषकावर नाव कोरलेय. तर 2023 मध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा टीम इंडियाला एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी उंचावताना पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. भारतीय संघाने शेवटचा एकदिवसीय विश्वचषक 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता.
पाहा व्हायरल व्हिडीओ---
दरम्यान, फायनलचा महामुकाबला 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी पीएम मोदी स्वत: उपस्थित राहणार आहेत. दैनिक जागरणने याबाबत वृत्त दिलं आहे.
न्यूझीलंडला पराभवाचा धक्का देत भारताने गाठली फायनल -
वानखेडेवर न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने चौथ्यांदा वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. यंदाच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला. भारताने आतापर्यंत दोन वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. चाहत्यांना तिसऱ्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. वानखेडेवर भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. यामध्ये विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शतके झळकावली. मोहम्मद शमीने 7 विकेट घेतल्या. भारतायी संघ तिसऱ्या विश्वचषक उंचवणार का? याकडे जगभरातील चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.